ज्या ज्ञानेश कुमार यांच्यावर तुम्ही आरोप करताय, त्यांनीच..महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याने दिलं ज्ञानेश कुमारांच्या पारदर्शकतेचं उदहारण

Garjana Morcha : ठाकरेंचा आज गर्जना मोर्चा आहे. हा मोर्चा सुरु होण्याआधी महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याने ज्ञानेश कुमार यांच्या पारदर्शकतेचं उदहारण दिलं आहे. ठाकरे बंधुंवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

ज्या ज्ञानेश कुमार यांच्यावर तुम्ही आरोप करताय, त्यांनीच..महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याने दिलं ज्ञानेश कुमारांच्या पारदर्शकतेचं उदहारण
gyanesh kumar
| Updated on: Oct 04, 2026 | 11:33 AM

“पराभवाच्या भितीने रस्त्यावर उतरणाऱ्या विरोधकांच्या हातातून निवडणूक आयोगाने शेवटचा मुद्दाही काढून घेतलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने वगळलेल्या मतदारांची नावं पुन्हा जोडण्यासाठी बीएलओ घरोघरी पाठवण्याची विशेष मोहिम जाहीर केली आहे. ज्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधक आरोप करत होते, त्यांनीच ही पारदर्शकता दाखवली आहे” असं आमदार आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. “मोर्चासाठी विरोधकांकडे कारणच काय उरलय? याच लोकसभेला काँग्रेस, मविआचे 30 खासदार निवडून आले. वरळीत आदित्य ठाकरे, बारामतीला मोठ्या ताई निवडून आल्या तेव्हा तुम्ही गुलाल उधळलात. मग तीच मतदार यादी विधानसभेला अचानक बोगस कशी काय झाली?” असा सवाल चित्र वाघ यांनी विचारला.

“कर्नाटक, तेलंगणला जिंकलात तेव्हा आयोग चांगला होता. महाराष्ट्रात तुम्हाला जनतेने नाकारलं, तर आयोग वाईट हा दुटप्पीपणा चालणार नाही. लोकसभेला जेव्हा आमचे 9 खासदार निवडून आले, तेव्हा आम्ही घरात बसून कोमट पाणी प्या, फेसबुकवर लाइव्ह करत बसलो नाही. जनतेमध्ये गेलो, 71 लाख अतिरिक्त मत मिळवून जनतेचा विश्वास जिंकला” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

Loading...

EVM वर खापर फोडण्याची पूर्वतयारी

“काल परवापर्यंत एकमेकांवर चिखलफेक करणारे ठाकरे बंधु आज केवळ राजकीय अस्तित्वासाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेत. जनतेला मूर्ख समजणं बंद करा. निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने निवडणूक आयोग, EVM वर खापर फोडण्याची पूर्वतयारी आहे” असा दावा चित्रा वाघ यांनी केला.

या नौटंकीला बळी पडणार नाही

“जनतेचा कौल स्वीकारण्याची हिम्मत नसल्याने मोर्चे निघतायत. स्वत:चा जनाधार संपल्यामुळे दोन्ही भावांना ऐकमेकाच्या खांद्याचा आधार घ्यावी लागतोय. पण महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे. या नौटंकीला बळी पडणार नाही. अहो, निवडणूक आयोग स्वायत्त आहे. विसरलात काय, जेव्हा निकाल तुमच्या बाजूने लागतो तेव्हा निवडणूक आयोग चांगला आणि निकाल विरोधात लागला की निवडणूक आयोग वाईट कसं काय? हा दुटप्पीपणा चालणार नाही” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us