AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!

पुणे मेट्रो प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर सणसणीत टीका केली आहे.

वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 12:00 PM
Share

मुंबईः पुणे मेट्रो प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर सणसणीत टीका केली आहे. शरद पवार हे एकिकडे वयाच्या थोरलेपणाची अपेक्षा बाळगतात आणि दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेून फिरतात, असा आरोप त्यांनी केलाय. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नाही म्हणून हताश झाल्यामुळेच पवार यांनी अशी टीका केली आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आल्यापासून एकदाही राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदी बसवता आलेला नाही, अशी खोचक टीका पडळकर यांनी केली आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले, ‘ पवार साहेबांचं भाषण ऐकून आवाक झालो. वयाच्या थोरलेपणाची, मनात अपेक्षा ठेवायची अन् वैराग्याच्या काळात बगल में छुरी घेऊन फिरायचं. पुणे मेट्रोच्या कार्यक्रमाचं निमंत्रण न मिळाल्यानं हताश होऊन ते बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे की, माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पुत्र सदाभाऊ खोत असो की वंचिताचा पुत्र राम सातपुते असो. यांच्यासारख्या पोरांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य प्रवाहात आणलं. त्यामुळे या महाराष्ट्रातील प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतायत, अशी टीका पडळकर यांनी केली.

राष्ट्रवादीचा एकदाही मुख्यमंत्री नाही- पडळकर

राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं निवडून दिलं, असं वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांना उद्देशून गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘ मी माननीय पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात 20219 ला माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 असे एकूण 161 आमदार महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरिताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात साताऱ्यात पावसात भिजूनसुद्धा 54 आमदार निवडून आले. त्यामुळे जनतेने तुम्हाला निवडून दिलं या थापा मारणं बंद करा. आपण म्हणता पुन्हा येऊ देणार नाही. पण तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादीचा नेता तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती बाजू घेणं खूप सोपं आहे. पण लोकहितासाठी लढणं, झगडणं हे महाकठीण आहे, असा खोचक निशाणा पडळकर यांनी लगावला.

इतर बातम्या-

नारायण राणेंना 9 चा फेरा, मुंबईतल्या अधिश बंगल्यात किती ठिकाणी बेकायदा बांधकाम? बीएमसीची नोटीस

प्रत्येक पक्षात नारद असतात, त्यांना सांभाळलं तरच निवडणुका मविआ म्हणून लढू, गुलाबराव पाटील यांच्या निशाण्यावर कोण?

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.