मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने …भाजपाची मोठी मागणी!

मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने ...भाजपाची मोठी मागणी! bjp leader navnath ban demands file case against amit thackeray for removing narendra modi photo

मोदींचा फोटो हटवल्याने वातावरण तापलं , अमित ठाकरेंवर तातडीने ...भाजपाची मोठी मागणी!
amit thackeray and narendra modi photo
| Updated on: Aug 31, 2026 | 3:52 PM

मनसेचे नेते अमित ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांच्यासोबत मनसेचे काही कार्यकर्ते होते. विद्यालयाच्या वसतीगृह अधिक्षकाच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून आक्षेप घेतला. छत्रपती शिवरायांच्या फोटोच्या बाजूला मोदी यांचा फोटो लावायचा नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर मोदी यांचा फोटो हटवण्यात आला. आता याच फोटो हटवण्यावरून चांगालच वाद पेटला आहे. भाजपाने अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

मोदी यांचा फोटो लावणे हा..

अमित ठाकरे यांच्या सांगण्यावरून मोदी यांचा फोटो हटवल्यानंतर आता भाजपाचे नेते नवनाथ बन आक्रमक झाले आहेत. त्यांनी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचं काम केलं आहे. ते मनसेचे नवे नवे झालेले नेते आहेत. मोदी यांचा फोटो लावणे हा प्रोटोकॉलचा भाग आहे,  प्रोटोकॉलच्या माध्यमातून हे सगळं होतं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

अमित ठाकरे नव्याने घराच्या बाहेर पडले

भारतीय पंतप्रधानांचा फोटो प्रत्येक शासकीय कार्यालयात असतो. अमित ठाकरे जेथे गेले ते शासकीय कॉलेज आहे. फोटो काढण्याच्या आधी प्रोटोकॉल वाचायला हवा होता.ते नव्याने घराच्या बाहेर पडले आहेत. घरात बसणाऱ्यांना प्रोटोकॉल माहिती नसतो, अशी खोचक टीकाही नवनाथ बन यांनी केली.

वसतिगृहाच्या अधिक्षकांना धारेवर धरलं

दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्यानंतर अमित ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणखी एक गुन्हा दाखल झाला तर हरकत नाही, असं ते म्हणाले आहेत. आपल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या भेटीत अमित ठाकरे यांनी वसतिगृहाच्या अधिक्षकांना धारेवर धरलं. वसतीगृहातील जेवण, स्वच्छता याविषयी त्यांनी अधिक्षकांनी जाब विचारला. आपल्या संभाषणाच्या दरम्यान अमित ठाकरे यांनी कांद्याचे एक रॅकेट अधिक्षकांच्या टेबलवर ठेवले. तसेच काही फोटोदेखील त्यांना दाखवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारले.

Follow Us