भाजप खासदाराच्या बहिणीने डोकेदुखी वाढवली, शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करत बंडखोरी, महायुतीत बिघाडी?

अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये आता मोठ्या हालचाली सुरु आहेत. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज भाजपमधीलही अनेकांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे.

भाजप खासदाराच्या बहिणीने डोकेदुखी वाढवली, शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करत बंडखोरी, महायुतीत बिघाडी?
Amravati News
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 5:09 PM

स्वप्नील उमप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आता बंडखोरी पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आज (६ ऑक्टोबर) असल्यामुळे सर्व इच्छूक उमेदवारांनी आपल्या भूमिका स्पष्ट करुन त्यांचे निर्णय घेतलेय त्यामध्येच आज भाजप महायुतीकडून उमेदवारी नम मिळाल्याने अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीची उमेदवारी न मिळाल्याने अखेर भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी डॉ. संगीता शिंदे यांनी भाजपा मधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

संगीता शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीने पाठिंबा मिळवत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिक्षकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. गेल्या १८ वर्षापासून मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढतो आहे. त्यामुळे शिक्षक मला पाठिंबा देतील आणि माझा विजय निश्चित होईल असा विश्वास देखील संगीता शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

अमरावतीमध्ये नेमकं काय घडतंय?

दरम्यान, अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळते आहे. इथे अनेक दिग्गज आणि बंडखोर उमेदवार मैदानात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडून अदिती पोहरे, ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने आणि शिवसेना किरण सरनाइक यांच्यामध्ये प्रमुख लढत पाहायला मिळेल. विदर्भाचा विचार करायचा झाल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू तसेच माजी शिवसेना आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.

भाजपसंबंधीत अनेक बंडखोरांनीही या निवडणुकीत उमेदवारी दाखल केलीय. शेखर भोयर भाजप आमदार राजेश वानखेडे यांचे मेहुणे असून सुमित पवार हे भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातंय. एवढच नाही तर पोहरादेवीचे महंत सुनील महाराज आणि भाजप खासदार आता अनिल बोंडे यांच्या बहिण संगीता शिंदे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता पुढे आता नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us