AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Black magic against Minister : एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा, मोठं राजकीय षडयंत्र?

Black magic against Eknath Shinde : एकनाथ शिदेंच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचं काल उघड झालंय.

Black magic against Minister : एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा, मोठं राजकीय षडयंत्र?
| Updated on: Dec 18, 2020 | 11:38 AM
Share

मुंबई :  नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Black magic against Eknath Shinde) यांच्याविरोधात नेमकं कोण राजकीय षडयंत्र रचतंय याचा कसून तपास पोलीस करतायत. शिदेंच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा (Black magic against Eknath Shinde) केला जात असल्याचं काल उघड झालंय. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत दिसतो. त्यासाठी आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करतायत. (Black Magic Rituals against Minister Eknath Shinde latest exclusive video)

एकनाथ शिंदेची राजकीय सुपारी कुणी दिलीय का? दिली असेल तर ते कोण आहेत? नेमके किती कोटी किंवा लाख रुपये त्यासाठी दिले गेलेत, इतर कुठला व्यवहार झालाय का, एकनाथ शिंदेंविरोधात नेमकं कोण शत्रूत्व घेतंय, याचा तपासही जव्हार पोलीस करतायत.

काय आहे नेमकं प्रकरण?

ठाणे (Thane) जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जीवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर (Black Magic) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जादुटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे (Black Magic Done To Endanger Minister Eknath Shindes Life).

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात होता.

अघोरी पूजा करणाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना रंगेहाथ अटक केली.

एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा, Exclusive Video

(Black Magic Rituals against Minister Eknath Shinde latest exclusive video)

संबंधित बातम्या 

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा शत्रू कोण? दोघांना अटक 

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.