Shweta Mahale : कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा..श्वेता महालेंचं शिंदेंच्या आमदाराला उत्तर

"खोट्या केसेस करायच्या, महिलांचा चुकीच्या पद्धतीने वापर करायचा , गोरगरिबांच्या पोरांना अडकवायचे, जमिनी बळकावयाच्या असले धंदे चिखलीत होत नाहीत. एवढे तुम्ही म्हणता तर नार्को टेस्ट करा, महाले साहेबांची पण करा, दूध का दूध पानी का पानी होवून जाऊद्या"

Shweta Mahale : कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा..श्वेता महालेंचं शिंदेंच्या आमदाराला उत्तर
Shweta Mahale
| Updated on: Sep 12, 2026 | 5:33 PM

गणेश सोलंकी, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाच्या वर्चस्वावरुन चिखलीच्या आमदार श्वेता महाले आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात सामना सुरु झाला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत परस्परांवर टीकेचे आसूड ओढले. “जिल्ह्यातील परिस्थिती संदर्भात कालच मदत व पुनर्वसन मंत्र्यासोबत चर्चा झाली.शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही.मात्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार.संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर होईल असं आश्वासन मंत्र्यांनी दिलं आहे” असं श्वेता महाले म्हणाल्या. “मला जनतेने मतदार संघाचा विकास करण्यासाठी खुर्चीवर बसवलय. विकासाचा मुद्दा सोडून मात्र दुसऱ्याच्या मतदारसंघांमध्ये ढवळाढवळ करणे योग्य नाही. महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे, मात्र काही लोकांना दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन ढवळा ढवळ करण्याची सवय आहे” असा नाव न घेता महालेंनी संजय गायकवाड यांना टोला लगावला.

“शक्ति प्रदर्शन करण्याची मला आवश्यकता नाही. त्यांचं कुटुंब, त्यांचे आई-वडील त्यांचे मित्र मंडळ सुद्धा बुलढाण्यामध्ये राहतात. अधिकारी मित्राचा वाढदिवस असल्याने महाले साहेबांच्या मित्रांनी साजरा केला.लोकशाही मार्गाने वाढदिवसाचे कट आऊट लावताना काही राजकीय लोकांनी काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राजकीय वातावरण तापले .तुम्ही सुद्धा चिखलीत रॅली काढली, तेव्हा आम्ही काहीही केलं नाही” असं श्वेता महाले म्हणाल्या.

80 हजाराची अपेक्षा तर 500-600 वर आले

आमदार गायकवाड यांनी महाले यांनी वाढदिवसाला कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप केला. “आम्ही कुणीच पैसे खर्च केले नाही. जे केले ते त्यांच्या मित्रानी खर्च केले. हुकूमशाही, दडपशाही बुलढाण्यात चालणार नाही. बुलढाणेकर अजिबात भीक घालत नाही” असं श्वेता महाले म्हणाल्या. बापासारखे शरीर कुठून आणणार? या गायकवाडांच्या वक्तव्यावर कायदेशीर मार्गाने जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “तुम्ही आमदार असलात तरी कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही तसा कायदाही नाही. याबाबतीत मी कायदेशीरमार्गाने जाणार, वकिलांचा सल्ला घेणार आहे” असं श्वेता महाले यांनी सांगितलं.

बाप जर कुणी असेल तर..

“बाप जर कुणी असेल तर सर्वसामान्य जनतेला मी बाप मानते. बाप काढणे आणि बोलणे हे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. वकिलांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करेन. ज्यांच्यावर ते संस्कार झालेले असतील, त्याठिकाणी त्यांनी त्यांचा बाप दाखवावा, ती भाषा बोलावी. जनता खरा बाप असून विधानसभेत खरा बाप कोण आहे हे जनतेने दाखवून दिले. त्यांना 80 हजाराची अपेक्षा तर 500-600 वर आले” असं श्वेता महाले म्हणाल्या.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us