चार आमदारांचा मामा! प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर राजन पाटलांची चर्चा; फॅमिली ट्री बघाच!
प्रतापसिंह पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या पक्षाचे सतीश चव्हाण हे निवडणकू लढवत होते. या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी पूर्ण ताकद लावली होती.

Chhatrapati Sambhajinagar MLC Result : राज्यात विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक झाली. आता या निवडणुकीचा निकालही स्पष्ट झालाय. एकूण पाच जागांपैकी महायुतीला तीन तर महाविकास आघाडीला दोन जागांवर विजय मिळवता आलाय. या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पदवीधर मददारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला. या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रतापसिंह पाटील यांनी विजय खेचून आणला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सतीश चव्हाण यांचा पराभव झालाय. दरम्यान, आता प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर माजी आमदार पाटील यांची चर्चा होत आहे. प्रतापसिंह पाटील विजयी झाल्यानंतर राजन पाटलांचे एकूण तीन भाचे आमदार म्हणून विधीमंडळात असतील.
राजन पाटील यांचे तीन भाचे आमदार
प्रतापसिंह पाटील हे राजन पाटील यांचे भाचे आहेत. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर राजन पाटील यांच्या परिवारात आणखी एका आमदाराची भर पडल्याची भावना व्यक्त केली जातेय. विजयसिंह पंडित, राहुल पाटील हे राजन पाटलांचे दोन्ही भाचे अगोदरच आमदार आहेत. आता प्रतापसिंह पाटील यांचीही त्यात भर पडली आहे. विजयसिंह पंडित हे गेवराई मतदारसंघातून आमदार आहेत.
View this post on Instagram
दुसरीकडे राहुल पाटील हे परभणी जिल्ह्यातून तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. असे असताना आता प्रतापसिंह पाटील हेदेखील छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राजन पाटील यांच्या बहिणीच्या मुलीचे पती राजेश विटेकर आहेत. म्हणजेच राजेश विटेकर राजन पाटलाच्या भाचे जावई आहेत. म्हणजेच राजन पाटील यांच्या घरात एकूण चार आमदार आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
View this post on Instagram
प्रतापसिंह पाटील यांना किती मतं मिळाली?
प्रतापसिंह पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या पक्षाचे सतीश चव्हाण हे निवडणकू लढवत होते. या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी पूर्ण ताकद लावली होती. सतीश चव्हाण हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु प्रतापसिंह पाटील यांना पदवीधरांनी भरभरून मतं दिली आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. संभाजीनगरच्या जागेवर एकूण 191689 मतदार होते. यापैकी सतीश चव्हाण यांना 60878 मतं मिळाली. तर प्रतापसिंह पाटील यांना 74 हजार 43 मता मिळाीली आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिलीप घुगे यांना 8483 मतं मिळाली आहेत. त्यामुळे प्रतापसिंह पाटील यांचाच विजय निश्चित मानला जातोय. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.
