AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याचं कारण काय? अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं…

या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अंबादास दानवे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यासाठी मी वैधानिक अधिकाराचा वापर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं.

Ambadas Danve : राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याचं कारण काय? अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं...
अंबादास दानवेंनी स्पष्टचं सांगितलं...Image Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Sep 16, 2022 | 5:00 PM
Share

बुलडाणा : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात जाण्यामागे शिंदे -फडणवीस सरकार जबाबदार आहे. अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची बुलडाण्यात केली. महाराष्ट्रापूर्वी गुजरातच्या निवडणूक असल्याने प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील (Maharashtra) फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) वळवण्यात आलाय. यामुळे एक लाखापेक्षाही जास्त तरुणांचा रोजगार यामधून गेलाय. यामागे केंद्राचा हात असून शिंदे -फडणवीस सरकार याला जबाबदार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

बुलडाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने अंबादास दानवे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला अंबादास दानवे आले असताना ते आज बोलत होते.

वैधानिक अधिकाराचा वापर करणार

संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अंबादास दानवे यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यासाठी मी वैधानिक अधिकाराचा वापर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं.

शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही

देशातील बारा राज्यातील शिवसेना अध्यक्ष यांनी देखील आता शिंदे गटाला समर्थन दिलं. या प्रश्नावर उत्तर देताना दानवे यांनी सांगितले की, ह्या गोष्टी होऊन गेल्यात. मात्र बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक जागेवरच आहे. त्यामुळे शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही. बाळासाहेबांना माननारे लोकं अजूनही शिनसेनेतच आहेत. त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे.

मंत्रालयात लागलेल्या ed च्या पाटी संदर्भात विचारले असता, दानवे म्हणाले की ते ed सरकार आहेच न मग पाट्या लागणारच…

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत