AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही; भुजबळांनी कारवाईचा काय दिला इशारा?

बैठकीत छगन भुजबळ म्हणाले, राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी.

शिवभोजन केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही; भुजबळांनी कारवाईचा काय दिला इशारा?
पुणे येथे छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 13, 2022 | 9:16 PM
Share

पुणेः शिवभोजन (Shivbhojan) केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही. शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांना प्रथम वेळी कारणे दाखवा नोटीस द्या, दुसऱ्यांदा देखील गैरप्रकार केल्यास मोठ्या रकमेचा दंड करावा आणि पुन्हा तिसऱ्यांदा गैरप्रकार आढळल्यास सदर आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहेत. पुणे (Pune) शासकीय विश्रामगह येथे भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले, वैधमापन विभागाच्या सहनियंत्रक सीमा बैस, परिमंडल अधिकारी दिनेश नामदेव तावरे, गजानन देशमुख, तुषार नावडकर, प्रशांत खताळ, चांगदेव नागरगोजे आदी उपस्थित होते .

सर्वात लोकप्रिय योजना

बैठकीत भुजबळ म्हणाले, राज्यात शिवभोजन योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. शिवभोजन केंद्र देताना दिव्यांग तसेच महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाते, या माध्यमातून अधिकाधिक गरजू महिलांना रोजगार मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दक्षता समित्यांची स्थापना

पुणे शहर तसेच जिल्ह्यात दक्षता समित्यांची गतीने स्थापना करावी, असे सांगून भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात धान्याचा उपयोग संपूर्ण क्षमतेने करा.धान्याच्या दर्जाबाबत तक्रारी येता कामा नये, अशा त्यांनी सूचना केल्या. पुणे जिल्ह्यात 5% धान्याची बचत होत असल्याने यामधून इतर पात्र सुमारे वीस हजार कार्डधारकांना अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा लाभ देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. गरजू तसेच नियमात बसत असेल, त्याला शिधापत्रिकेचे वितरण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

ई-पॉस मशीनच्या तक्रारी

ई – पॉस मशीनचा वापर करतांना अनेक तक्रारी येत असल्याने काळानुरूप त्यात बदल करण्यात यावेत, अशी मागणी अधिकाऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. त्यावर ई-पॉस मशीनमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मात्र, याबाबत आलेल्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. आधार जोडणी वाढविणे, कल्याणकारी संस्थांचे नियमन, पुणे जिल्ह्याचा आयएसओ उपक्रम आदीबाबत भुजबळ यांनी आढावा घेतला. तसेच साठवण क्षमता वाढविण्यासाठी गोदाम उभारणीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पुणे जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान