सुट्ट्या तेलावर आज फैसला, तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर थेट बैठक, देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू..

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोठी कारवाई भेसळ खोऱ्यांविरोधात केली जात आहे. राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी आहे. त्यातच आज यावर फैसला होणार आहे.

सुट्ट्या तेलावर आज फैसला, तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर थेट बैठक, देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात चेंडू..
Tukaram Mundhe Devendra Fadnavis
| Updated on: Sep 01, 2026 | 9:42 AM

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतली. मोठ्या हॉटेलवर त्यांनी बेधडक कारवाया केल्या. नामांकित ठिकाणी जिथे आपण खायला जातो, तिथे नक्की का होते, हे पाहून सर्वांनाच धक्का बसला. हेच नाही तर मंत्रालयातील कॅटिंगचाही परवाना त्यांनी रद्द केला. तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा तेलाकडे वळवला. सुट्ट्या तेलाबाबत त्यांनी मोठा निर्णय घेतला. सुट्ट्या तेलावर त्यांनी पूर्णपणे बंदी घातली. सुट्या तेलाच मोठी भेसळ होत असल्याचे त्यांनी म्हटले. हेच नाही तर हे तेल नक्की कुठून कसे येते, याची काहीच माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले. नागरिकांनाही मोठे आवाहन करत त्यांनी म्हटले की, लोकांनी पॅकेटचेच तेल खरेदी करावे.

एकीकडे त्यांच्या या कारवाईने मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू कुटुंबात आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, हातावर पोट भरणाऱ्या लोकांवर संकट आले. 40-50 रूपयांचे तेल घेऊन धकवणारे लोक अडचणीत सापडले आहेत. यासोबतच राज्यातील बड्या नेत्यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. काहींनी सुट्टे तेल विकण्याचा व्यवसाय पारंपारिक असल्याचेही म्हटले.

यासोबतच सुट्टे तेल विक्री करणारे व्यापारीही अडचणीत सापडले आहेत. चंद्रशेखर बावनकुळेही यावर बोलताना दिसले. सध्या राज्यात सुट्ट्या तेलावर बंदी आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक आहे. राज्यातील सुट्या तेलावर फैसला होणार आहे. देवेंद्र फडणवीस यावर चर्चा करणार आहेत. अनेक नेत्यांनी सुट्ट्या तेलाच्या बंदीविरोधात भाष्य केले.

हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले जातंय. शेवटी आता सुट्या तेलाचा मुद्दा फडणवीस यांच्याकडे गेला. देवेंद्र फडणवीस यावर नक्की काय निर्णय घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तुकाराम मुंढे यांनी अगोदरच स्पष्ट केले की, अगोदरच राज्यात सुट्या तेलावर बंदी आहे. आता फक्त त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत.

Follow Us