मोठी बातमी! कॉकरोचची टीम संभाजीनगरमध्ये; दोन दिवसांची मॅरेथॉन बैठक, लवकरच…

Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा ठरविण्यासाठी संभाजीनगरमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी CJP ची टीम दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे.

मोठी बातमी! कॉकरोचची टीम संभाजीनगरमध्ये; दोन दिवसांची मॅरेथॉन बैठक, लवकरच...
CJP Meeting in Sambhaji Nagar
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 10:25 PM

राजधानी दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. अशातच आता पार्टीची पुढील दिशा ठरविण्यासाठी CJP ने संभाजीनगरमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी कॉकरोच जनता पार्टीची टीम दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे. उद्या आणि परवा दोन दिवस अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. आशुतोष रांका, सौरव दास त्यांच्यासह इतर सहकारी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या बैठकीबाबत सौरव दास यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

CJP ची संभाजीनगरमध्ये बैठक

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटले की, आमची दोन दिवस 5 आणि 6 तारखेला बैठक आहे. CJP चे सगळे लीडर आणि प्रवक्ते या बैठकीला उपस्थित आहेत. पाच आणि सहा तारखेला आम्ही बसून चर्चा करू की पुढे आम्हाला काय करायचे आहे. तरुणाईच्या या चळवळीला कोणत्या दिशेने पुढे न्यायचं हे आम्ही ठरवणार आहोत. सहा तारखेला आम्ही माध्यमांना सांगू की आमचा फायनल निर्णय काय झाला.

झारखंडच्या विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा

पुढे बोलताना सौरव दास यांनी म्हटले की, झारखंडच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमचा सपोर्ट आहे. अभिजीत व आशुतोष हे त्यांच्याशी बोललेले आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना आमचा सपोर्ट आहे. हे आंदोलन पुढे कसे जाईल याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. दोन दिवसीय बैठकीला आम्ही एकूण CJP चे 7 सदस्य आहोत व इतर ज्यांनी सहकार्य केले ते सुद्धा आमच्या सोबत आहेत.

अभिजीत दिपके यांच्या विरोधात तक्रार

दरम्यान, दिल्लीतील एका व्यक्तीने सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांच्या विरोधात दिल्लीत पोलीसात तक्रार दिली आहे. अभिजीत दिपके यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. फैजान अन्सारी असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांनी दिपके यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी आंदोलनावेळी केलेल्या कारवाईवरून दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांचं कौतुक केलं. तसेच दिपके हे स्वार्थासाठी वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us