Independence Day : पाच वर्षात जनतेची सेवा अव्याहतपणे केली, पुढेही करु : मुख्यमंत्री

देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं.

Independence Day : पाच वर्षात जनतेची सेवा अव्याहतपणे केली, पुढेही करु : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 15, 2019 | 9:37 AM

Independence Day मुंबई : देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्य प्रधान सचिव, माजी प्रधान सचिव, विविध विभागाचे सचिव, इतर सनदी अधिकारी, आजी-माजी आमदार आणि पोलिस दलाचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहिले.

दरम्यान, मानवंदना देण्यासाठी खास गुजरात पोलिसांचीही तुकडी आली. यासोबतच बृहन्मुंबई पोलिसांची तुकडी आणि एसआरपी अशा तीन तुकड्यांनी सलामी दिली.

मुख्यमंत्र्यांचं भाषण

“आजचा स्वातंत्र्य दिन अनोखा असा आहे. लढाख, काश्मीरमध्ये आज शांततेत तिरंगा फडकावला गेला. आज राज्यात पूरपरिस्थिती आहे. सरकारने आणि इतर सर्व यंत्रणांनी प्रचंड परिश्रम करुन पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेले. आता आपल्यासमोर आव्हान आहे, ज्याचे संसार उद्ध्वस्त झाले, त्यांना उभे करण्याचे काम सरकारला करावे लागेल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्राकडे पूरग्रस्तांसाठी मदत

केंद्र सरकारकडे 6 हजार 800 कोटींच्या पॅकेजची मागणी केली आहे. त्यातून आम्हाला विकास करायचा आहे. पूरग्रस्तांचे पुनर्वसन वेळेत करु. अनेकजण पूरग्रस्तांच्या पाठीशी आणि आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मी आभार व्यक्त करतो.

दुष्काळ मुक्तीसाठी प्रयत्न

सरकारने सामान्य माणसाच्या जीवनात बदल होतील यासाठी सकारात्मक प्रयत्न केला. राज्याला आम्ही जलयुक्त शिवार आणून पाण्याचा प्रश्न सोडवला. राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प आहे.  वाहून जाणारे पाणी आणायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भाग आम्ही दुष्काळ मुक्त करु.

महाराष्ट्र अग्रेसर

गेल्या पाच वर्षात राज्याला अग्रेसर करू शकलो. भक्कम केले, उद्योग, अर्थव्यवस्था भक्कम केली. वंचित समाजासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास पोहोचला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करत आहोत.

पंतप्रधान मोदींनी दिलेल्या त्रिसूत्रीवर काम चालू आहे.  गरिबांपर्यंत विकास घेऊन जाऊ. देशाच्या आर्थिक विकासात तीन ट्रिलियन व्यवस्थेत आमचा सर्वात मोठा वाटा असेल. पाच वर्षात आपली सेवा अव्याहतपणे केली, पुढेही आम्ही ती करु, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.