Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात आता कुठल्याही क्षणी लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी दिलेली कालमर्यादा संपत चालली !

| Updated on: Apr 03, 2021 | 7:11 PM

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात आता कुठल्याही क्षणी लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी दिलेली कालमर्यादा संपत चालली !
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (2 एप्रिल) राज्यात लॉकडाऊनवर निर्णय घेण्यासाठी 3 दिवसांची कालमर्यादा दिली होती. आता त्यापैकी 24 तास उलटून गेलेत. त्यामुळेच आता महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत प्रशासनाने पूर्ण तयारी केल्याचंही बोललं जातंय (CM Uddhav Thackeray may announce Lockdown in Maharashtra amid increasing corona infection).

उद्धव ठाकरे बैठकीत काय म्हणाले?

उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत म्हणाले, “सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही, पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार आहे. ही लढाई एकट्या सरकारची नाही, तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते पाळल्याने ही साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.”

‘कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको’

“कोरोनाच्या नव्या अवतारामुळे सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या सरकार निश्चितपणे अमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको, तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊ यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे. त्या कामी माध्यमांनी सहकार्य करावे,” असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलंय.

ऑक्सिजन उत्पादन वैद्यकीय उपयोगासाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज आपण ऑक्सिजन उत्पादन वैद्यकीय उपयोगासाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. खासगी व बंधपत्र–करार स्वरुपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई-आयसीयूचा उपयोग कसा करता येईल तेही पाहतो आहोत.”

‘सरकारने निर्णय घेतल्यास माध्यमांनी हेतू पहावा आणि वस्तूस्थिती मांडावी’

“जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनी देखील त्यामागील हेतू पहावा आणि वस्तूस्थिती मांडावी. या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर, टेलीमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे, वारंवार जनतेशी संवाद साधणे,” अशा अशा विविध सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

हेही वाचा :

Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?

ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार

महाराष्ट्र जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट, तर आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात भीषण उद्रेक

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray may announce Lockdown in Maharashtra amid increasing corona infection