महाराष्ट्र जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट, तर आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात भीषण उद्रेक

जगभरात कोरोनाची दुसरी लाट आलीय. सर्वच ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातच महाराष्ट्रातील परिस्थितीही चिंताजनक आहे.

महाराष्ट्र जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट, तर आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात भीषण उद्रेक


मुंबई : जगभरात कोरोनाची दुसरी लाट आलीय. सर्वच ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातच महाराष्ट्रातील परिस्थितीही चिंताजनक आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत नागरिकांना माहिती देत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात मोठ्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्राचाही समावेश झालाय. या यादीत महाराष्ट्र चौथा स्थानी आहे. याशिवाय आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचा इतका भीषण उद्रेक झालेला पाहायला मिळालाय (Special report on how Maharashtra becoming world corona hotspot).

ज्या युरोप आणि अमेरिकेला कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वात मोठा फटका बसला त्यांनाही मागे टाकत महाराष्ट्र पुढे गेलाय. महाराष्ट्र युरोप, अमेरिकेपेक्षाही डेंजर झोनमध्ये गेलाय. सध्या एकट्या महाराष्ट्रात आशिया खंडातल्या कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक रुग्ण निघतायत. जगाचा विचार केला, तर मागच्या 24 तासात फक्त महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

1 एप्रिल 2021 रोजी जगात कुठे किती कोरोना रुग्ण?

1 एप्रिलला जगभरातील विविध देशांमध्ये किती कोरोना रुग्ण आढळले याची आकडेवारी समोर आलीय. यानुसार त्या 24 तासात ब्राझिलमध्ये 89 हजार 459 रुग्ण निघाले. तिकडे अमेरिकेत 76 हजार 789 नवे रुग्ण सापडले. युरोपच्या फ्रान्समध्ये 50 हजार 659 रुग्ण आढळले. या तिन्ही देशानंतर चौथ्या स्थानी महाराष्ट्राचा समावेश झालाय. 1 तारखेला महाराष्ट्रात 43 हजार 183 रुग्णांची नोंद झाली. हा आकडा राज्यातला आजवरचा सर्वाधिक आणि जगातला चौथ्या क्रमांकाचा मोठा आकडा ठरलाय.

एकट्या महाराष्ट्रात ब्राझिल, अमेरिका आणि फ्रान्सनंतर सर्वाधिक रुग्णवाढ

एक एप्रिलच्या आकड्यांची तुलना केली तर, काल एकट्या महाराष्ट्रात ब्राझिल, अमेरिका आणि फ्रान्सनंतर सर्वाधिक रुग्णवाढ होती. कालपर्यंत कोरोनाच्या भीषणतेसाठी सारं जग इटली आणि ब्रिटचनं उदाहरण देत होते. भविष्यात ती वेळ महाराष्ट्रावर येते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यातली भीषणता लक्षात येत नसेल, तर ही आकडेवारी जरुर वाचा

जर या आकड्यांवरुनही आपल्या लोकांना राज्यातली भीषणता लक्षात येत नसेल, तर देशातली सक्रीय रुग्णसंख्या आणि त्यात एकट्या महाराष्ट्रातला वाटा किती आहे ते एकटा नीट निरखून पाहू. सध्या देशात 6 लाख 14 हजार 664 सक्रीय म्हणजेच कोरोनाचा उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. 6 लाख 14 हजार 664 पैकी 3 लाख 66 हजार 533 म्हणजे निम्म्यांहून जास्त रुग्ण फक्त महाराष्ट्रातून समोर आलेत. दुसरी भयावह गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 लाख 66 हजार 533 सक्रीय रुग्णांपैकी तब्बल अडीच लाख रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नाशिक या पाच महानगरांमधले आहेत.

वर्ल्डोमीटरवरच्या आकड्यांची तुलना काय सांगतेय?

वर्ल्डोमीटरवरच्या आकड्यांची तुलना केली, तर महाराष्ट्रातली फक्त एकएकटी शहरं जगातल्या अनेक देशांवर भारी पडतायत. गेल्या 24 तासात 22 कोटींच्या पाकिस्तानात 4974 रुग्ण निघाले. आणि सव्वा कोटींच्या एकट्या मुंबईत 8646 रुग्ण सापडले. 27 कोटींच्या इंडोनेशियात 6142 रुग्ण सापडले आणि 1 कोटी लोकसंख्येच्या पुणे जिल्ह्यात 8025 रुग्ण मिळाले. 91 लाख लोकसंख्येच्या इस्रायलमध्ये काल फक्त 351 रुग्ण होते. दुसरीकडे 42 लाख लोकसंख्येच्या जळगाव जिल्ह्यात 1 हजार 65 रुग्ण सापडले. 11 कोटींच्या जपानमध्ये काल 3 हजार रुग्ण होते आणि जेमतेम अर्धा कोटीच्या नागपूर जिल्ह्यात 3696 रुग्ण आढळले.

गेल्या वर्षी कोरोनाच्या रौद्ररुपासाठी इटली आणि ब्रिटनचं उदाहरण दिलं जातं होतं, आता जर महाराष्ट्र कोरोनाच्या फेऱ्यातून सुटला नाही, तर साऱ्या जगासाठी महाराष्ट्र हे नवीन उदाहरण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

2025 पर्यंत प्रत्येक 10 पैकी 6 जण नोकर्‍या गमावतील; WEF च्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

CM Uddhav Thackeray PC : लस म्हणजे धुवाँधार पावसातील छत्री, मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे मुद्दे

18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, केंद्राकडे पाठपुरावा करा; नाना पटोलेंची मागणी

व्हिडीओ पाहा :

Special report on how Maharashtra becoming world corona hotspot

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI