Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. (Maharashtra Class 9th and 11th Exam)

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शिक्षण विभागाने नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. (Maharashtra Class 9th and 11th students exam decision taken soon said Varsha Gaikwad)
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिडची परिस्थित लक्षात घेता महाराष्ट्रातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केले जाणार आहे. तर नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी ते होणं शक्य नाही. राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
कोव्हिड काळात ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगल या माध्यमातून शिक्षण सुरु होते. पण आजचा निर्णय हा पहिली ते आठवीच्या विद्यार्थी जे RTE अंतर्गत त्यांना सरसकट पास करण्यात येणार आहे. तर 9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार
नव्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण बोर्डानं सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.
महाराष्ट्रातील परीक्षा कधी, कशा होणार?
- पहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द
- नववी ते अकरावी – लवकरच निर्णय
- दहावीच्या लेखी परीक्षा – 29 एप्रिल ते 20 मे
- बारावीच्या लेखी परीक्षा – 23 एप्रिल ते 21 मे
(Maharashtra Class 9th and 11th students exam decision taken soon said Varsha Gaikwad)
संबंधित बातम्या :
ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार
मोठी बातमी, पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, तारीखही ठरली