31 मार्चपर्यंत पूर्ण करा ही 5 महत्त्वाची कामं, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते

मुंबई : नवीन वर्षातील मार्च हा तिसरा महिना सुरु आहे. मात्र आर्थिक वर्षातील हा शेवटचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 मार्च या दिवशी तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. ही तारीख तुमच्यासाठी डेडलाईन असेल. जर या तारखेला दुर्लक्षित केलं, तर तुमचे खूप मोठं नुकसान होऊ …

31 मार्चपर्यंत पूर्ण करा ही 5 महत्त्वाची कामं, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते

मुंबई : नवीन वर्षातील मार्च हा तिसरा महिना सुरु आहे. मात्र आर्थिक वर्षातील हा शेवटचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 मार्च या दिवशी तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. ही तारीख तुमच्यासाठी डेडलाईन असेल. जर या तारखेला दुर्लक्षित केलं, तर तुमचे खूप मोठं नुकसान होऊ शकते. याशिवाय तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.

पॅनकार्ड आधारसोबत लिंक करणे

तुम्ही पॅनकार्ड आधार कार्डसोबत लिंक केलं नसेल, तर ते लवकरात लवकर करुन घ्या. कारण पॅनकार्ड आधारला लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2019 आहे. दरम्यान सरकारने गेल्यावर्षी 30 जून 2018 नंतर लिंकिंग तारीख वाढवून 31 मार्च 2019 केली होती. जर तुम्ही पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक केले नसेल, तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे.

31 मार्चपूर्वी टीव्ही चॅनल निवडा

तुम्ही अजूनही टीव्ही चॅनेलचे पॅकेज निवडले नसेल, तर 31 मार्चनंतर तुमचा टीव्ही बंद होण्याची शक्यता आहे. टेलीकॉम सेक्टरला रेग्युलेट करणारी संस्था ट्राय (TRAI) ने कॅबल आणि डीटीएच ग्राकांसाठी 31 मार्च 2019 पर्यंत आपल्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी सांगितले होते. यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आवडीचे चॅनेल पाहू शकता.

आयटीआर फाईल करण्याचा शेवटचा दिवस

जर तुम्ही 2017-2018 च रिटर्न फाईल केली नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत 31 मार्च 2019 पर्यंत हे काम पूर्ण करा. तुम्हाला पहिलेच उशिर झाला आहे. आणखी उशिर झालास तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. 5 लाख  रुपयेपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कमवणाऱ्या टॅक्सपेयर्ससाठी पेनल्टीची रक्कम ही फक्त 1 हजार रुपये आहे.

गुंतवणुकीचा शेवटचा दिवस

आयकर विभागाच्या 80C टॅक्सची सूट हवी असले, तर 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. ही गुंतवणूक जर तुम्ही आयकर विभागाला दाखवली, तर तुमचा टॅक्स वाचू शकतो. 80C नुसार एलआयसी, पीपीएफ, नॅशनल सिव्हिंग सर्टिफिकेट, पाच वर्ष एफडी, पेन्शन फंड, पोस्ट ऑफिस डिपॉजिट, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा टॅक वाचू शकतो.

शेअर विकता येणार नाही

तुमच्याकडे आताही फिजिकल फॉर्ममध्ये शेअर आहेत, तर त्याला 31 मार्च 2019 पर्यंत डीमॅटमध्ये कन्व्हर्ट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही असं नाही केलं, तर नियमानुसार शेअर वाचवणे शक्य नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *