Pune News : पुण्यात भर रस्त्यात काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला, हनुमंत पवार ठणकावून बोलले की, मी..

Pune News : "काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, यशवंतराव चव्हाण, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पाय त्या जमिनीला लागलेले आहेत. नारायण दाभाडे यांनी इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या त्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे" असं हुनमंत पवार म्हणाले.

Pune News : पुण्यात भर रस्त्यात काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला, हनुमंत पवार ठणकावून बोलले की, मी..
Congress spokeperson hanumant pawar
| Updated on: Feb 24, 2026 | 11:08 AM

पुण्यातील मित्र मंडळ चौकात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर काल हल्ला झाला. भाजप कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा आरोप आहे. या संबंधी हनुमंत पवार यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संवाद साधला. “गृहमंत्र्यांनी किंवा त्यांच्या अधिपत्याखालील पोलिसांनी या गुंडांना काल सोडून दिलं. त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. हा सुनियोजित कट आहे. सहाजण होते. ही दंगल आहे. मला मारायच्या उद्देशाने आलेले. पिस्तुल दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. शारीरिक माराहण झाली. एवढं करुनही काहीच कारवाई न करता सोडून देता. हे सरकार कुणाच्या पाठिशी आहे?” असा सवाल हुनमंत पवार यांनी विचारला आहे.

“हे पुणे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुणे आहे. पुण्यात नथुराम गोडसे निपजला होता, या त्याच्याच औलादी आहेत. पुण्याच्या सुस्कृंत राजकारणाचा चेहरा मोहरा बदलायचा हे भाजपवाल्यांनी ठरवलेलं दिसतय. भाजप महापौरांसह हजारो लोक काँग्रेस ऑफिसवर दगडं घालायला चालून आले. ज्या काँग्रेस भवनात स्वातंत्र्य चळवळीची आंदोलनं झाली. जे काँग्रेस भवन स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र होतं. काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, यशवंतराव चव्हाण, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पाय त्या जमिनीला लागलेले आहेत. नारायण दाभाडे यांनी इंग्रजांच्या गोळ्या खाल्ल्या त्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे” असं हुनमंत पवार म्हणाले.

अशा धमक्यांना आम्ही भीत नाही

“त्या पक्षाचा शिपाई आहे मी, स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या लोकांवर तु्म्ही दगड घालताय. आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडता आणि आमच्यावरच गुन्हे दाखल करता. काँग्रेस प्रवक्त्यासोबत एका दैनिकाच्या ऑफिसमध्ये तुम्ही मारामारी करता, पिस्तुल दाखवता हे नथुराम गोडसेचं पुणे आहे हे दाखवायला तुम्ही टपलेले आहात. पण हे पुणे महात्मा फुलेंच आहे. काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मारे, केशवराव जेधे यांचं पुणे आहे. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणार. अशा धमक्यांना आम्ही भीत नाही” असं हुनमंत पवार यांनी ठणकावून सांगितलं.

 

Follow Us