AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत… संजय राऊत यांचा अत्यंत मोठा गाैप्यस्फोट, थेट…

संजय राऊत यांनी अनेक गोष्टींवर थेट भाष्य केले. यासोबतच त्यांनी अजित पवार भाजपासोबत नक्की का गेले याबद्दलही खुलासा केला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची आता जोरदार चर्चा रंगत आहे. त्यांनी भाजपावरही आरोप केले.

एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत... संजय राऊत यांचा अत्यंत मोठा गाैप्यस्फोट, थेट...
Sanjay raut
| Updated on: Feb 24, 2026 | 10:15 AM
Share

संजय राऊत यांनी नुकताच मोठा दावा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण भाजपा तसे होऊ देणार नाही. त्यांना भाजपामध्ये जावे लागेल, तिथे काही वेळ काढावा लागेल, तेव्हा कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतात, त्याशिवाय नाही. हे आमचे सर्व सहकारी होते त्यांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम केले आहे. तेव्हा त्यांना शिवसेना फोडायची होती म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी म्हटले की, सुप्रीम कोर्ट हे भाजपाचे कार्यकर्ते आहे. सुप्रीम कोर्टातील बरेच न्यायाधिश हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, ते त्या पद्धतीने काम करतात. तुम्ही त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करता. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या सुप्रीम कोर्टाला मुर्ख म्हटलं, ज्यावेळी त्यांनी टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यावेळी ट्रंपने त्यांच्या कोर्टाच्या न्यायाधिशाला मुर्ख म्हटले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या कोर्टाला मुर्ख म्हटले… का मुर्ख म्हटले… ते सुप्रीम कोर्टालाही माहिती आहे, इतकेच मी सांगेन. लोकशाहीमध्ये आमची मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आम्हाला दिलाय. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना थोडीजरी लोकशाहीचे काही असेल तर त्यांनी या विषयात लक्ष घातले पाहिजे. पुण्याच्या हणमंत पवार मारहाण प्रकरणात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केले.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, विचारांची लढाई आपण विचारांनी करायचे बोलतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडेही विचार असावा लागतो ना..भाजपाकडे कोणता विचारच नाही. हिंदू मुसलमान यापेक्षा कोणता विचार आहे का त्यांच्याकडे? कोणताच विचार त्यांच्याकडे नाही… राजकीय विचार नाही, सामाजिक विचार नाही, सांस्कृतिक विचार नाही, सामाजिक विचार नाही… विचार असेल तर आम्ही विचारांची लढाई करू असेही राऊतांनी म्हटले.

जिव नकोसा होईल आणि तो इतका नकोसा करायचा की, तो आपला पक्ष सोडून तुमच्या पक्षात जाईल, इथंपर्यंत जीव नकोसा करायचा. हे अजित पवारांच्या बाबतीत झाले आहे आणि हे आम्ही डोळ्यांनी बघितले. अजित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे काय मनापासून भारतीय जनता पक्षाचा जवळ गेले नाहीत. हे आपली कातडी वाचायला आणि संपत्ती वाचवण्याकरिता गेले, असेही राऊतांनी म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...