AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत काही फेरबदल झाले आहेत. भारताचे आघाडीचे फलंदाज अव्वल स्थानासाठी लढत आहेत. फॉर्मात असलेले तीन भारतीय खेळाडू आयसीसी पुरुष एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी
| Updated on: Jul 22, 2026 | 3:35 PM
Share

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत काही फेरबदल झाले आहेत. भारताचे आघाडीचे फलंदाज अव्वल स्थानासाठी लढत आहेत. फॉर्मात असलेले तीन भारतीय खेळाडू आयसीसी पुरुष एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. शुभमन गिल (दुसरे), विराट कोहली (तिसरे) आणि रोहित शर्मा (चौथे) यांनी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतासाठी प्रभावी कामगिरी करून आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे.

गिलने तीन सामन्यांमध्ये एकूण 188 धावा केल्या, ज्यामुळे तो मिचेलपेक्षा (802 रेटिंग पॉइंट्स) एका रेटिंग पॉइंटने मागे आहे. इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत, ज्यात भारताचा 2-1 असा पराभव झाला, चांगल्या कामगिरीनंतर कोहली (767 पॉइंट्स) आणि रोहित ( 758 पॉइंट्स) हे देखील त्याच्या अगदी जवळ आहेत. इंग्लंडचा अनुभवी खेळाडू जो रूटने  249 धावा केल्या. त्यामुले त्याला त्याच्या कामगिरीचे फळ मिळाले असून, तो एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत चार स्थानांनी वर चढून आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

डॅरिल मिचेल: 802 रेटिंग शुभमन गिल: 801 रेटिंग विराट कोहली: 767 रेटिंग रोहित शर्मा: 758 रेटिंग इब्राहिम झद्रान: 712 रेटिंग

बेन डकेट 11 स्थानांनी झेप घेऊन 19 व्या स्थानावर पोहोचला आहे आणि जेकब बेथेल 5 स्थानांनी झेप घेऊन 64व्या स्थानावर पोहोचला आहे. यांनीही एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत आपली स्थिती सुधारली आहे. दरम्यान, न्यूझीलंडचे मायकल ब्रेसवेल 6 स्थानांनी झेप घेऊन 54 व्या स्थानावर आहे आणि मार्क चॅपमन 10 स्थानांनी झेप घेऊन 62 व्या स्थानावर आहे. यांनीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या प्रभावी फलंदाजीच्या कामगिरीनंतर क्रमवारीत प्रगती केली आहे.

गोलंदाजी क्रमवारी अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही या आठवड्यात लक्षणीय प्रगती केली आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत पाच बळी घेतल्यानंतर तो एका स्थानाने वर चढून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अबरार अहमद दुसऱ्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज गुडाकेश मोती (9वे स्थान) हा अव्वल 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा आणखी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचे सहकारी अल्झारी जोसेफ (26वे स्थान), ब्रेसवेल (29वे स्थान) आणि भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल 10 स्थानांनी वर चढून संयुक्त 32 व्या स्थानावर आहे. ब्रेसवेलनेही नवीनतम एकदिवसीय अष्टपैलू क्रमवारीत प्रगती केली आहे. कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंगसह दोन स्थानांनी झेप घेत तिसरे स्थान पटकावले आहे. तो अफगाणिस्तानचा अझमतुल्ला ओमरझाई आणि बांगलादेशचा मेहिदी हसन मिराज यांच्या पुढे आहे.

झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची मालिका संपल्यानंतर, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतही काही बदल झाले आहेत. झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेटने टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम नववे स्थान पटकावले आहे, तर बांगलादेशचे तन्झिद हसन (20वे) आणि सैफ हसन (27वे) यांनीही आपल्या स्थानांमध्ये सुधारणा केली आहे.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?