Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : Mumbai Corona | राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 44 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडाही दोनशे पार

| Updated on: Jan 10, 2022 | 12:04 AM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे.  राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : Mumbai Corona | राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 44 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडाही दोनशे पार
corona

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे.  राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 41 हजार 434 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 671 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Jan 2022 09:30 PM (IST)

    Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 44 हजार 388 नवे कोरोनाबाधित

    आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्क्यांवर पोहोचलाय. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत.

  • 09 Jan 2022 08:43 PM (IST)

    मुंबईत आज 19 हजार 474 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारनं 10 जानेवारीपासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवी नियमावलीही (New Corona Guidelines) शनिवार जाहीर करण्यात आली आहे. अशावेळी मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कारण मागील तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजाराच्या पुढे होता. तो आकडा आज 19 हजारावर आला आहे. दुसरीकडे पुण्यातील रुग्णांचा आकडा मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 09 Jan 2022 08:05 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये आज 15 जणांना ओमिक्रॉनची लागण

    पिंपरी चिंचवडमध्ये आज तब्बल 15  जणांना ओमिक्रॉनची लागण

    सहा पुरुष नऊ महिलांचा समावेश

    15 पैकी 04 रुग्ण कॅनडा, 01 मालदीव, 01 दुबई, 01रुग्ण माली  व 03 रुग्ण यूएसए मधून आले,  तर 05 रुग्ण हे परदेशामधून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत

  • 09 Jan 2022 07:17 PM (IST)

    नागपूर कोरोना अपडेट : गेल्या 24 तासांमध्ये 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद  

    जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    दिवसभरात 96 रुग्णांची कोरोनावर मात

    सध्यास्थितीमध्ये जिल्ह्यात 3345 सक्रिय रुग्ण

  • 09 Jan 2022 05:59 PM (IST)

    Pune Corona Update: पुणे महापालिका हद्दीत आज दिवसभरात 4 हजार 29 नवे कोरोनाबाधित

    पुणे : पुणे महापालिका हद्दीत आज दिवसभरात 4 हजार 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या आता 14 हजार 890 वर पोहोचली आहे. यातील 548 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

  • 09 Jan 2022 05:53 PM (IST)

    Maharashtra Corona Guidelines | राज्यात ब्यूटी पार्लर आणि जिम 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी

    राज्यात ब्यूटीपार्लर (Beauty Parlour) आणि जिम(Gym)वरील निर्बंधांत शिथिलता आणण्यात आलीय. जिम आण ब्यूटीपार्लर आता 50 टक्के क्षमतेनं सुरू केली जाणार आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाच आता याठिकाणी परवानगी असणार आहे. त्यासोबतच मास्क(Mask)चा वापर बंधनकारक करण्यात आलाय. वाढत्या कोरोना(Corona)च्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.

  • 09 Jan 2022 05:51 PM (IST)

    खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा

    नवी मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे, राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे गेली आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी रात्र दिवस तैनात असणाऱ्या, कोरोनाकाळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा वाढतोय, कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. चार दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुंबईतल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्युही झाल्याचे समोर आले आहे.

  • 09 Jan 2022 01:05 PM (IST)

    रुग्णसंख्या कमी झाल्यास निर्बंध शिथील करु, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई: विजय वडेट्टीवार

    जगात हा रोग पसरलाय,राज्यात रुग्णांची संख्या वाढतेय

    लोकांच्या काळजीपोटी राज्य सरकारला काम करावं लागेल

    आटोक्यात आलं तर आम्ही निर्बंध शिथील करु

    मात्र, रुग्ण वाढत असताना काळजी घेणं गरजेचं आहे

    पाच राज्यांच्या निवडणुकीत सभांना बंदी घातलीय

    राज्य सरकार, केंद्र सरकार निवडणूक आयोग लोकांच्या हितासाठी निर्णय घेतंय

    धार्मिक कार्यक्रम, लग्न, अंत्यविधी साठी मर्यादा लावली आहे

    तिसरी लाट कोरोनाचा शेवट असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं

    नियमांचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करावी लागले

    राज्याच्या हिताचा निर्णय असल्यास नियम बदलावे लागतात

    केंद्र सरकार राज्य सरकारांना विचारात घेतं का?

  • 09 Jan 2022 12:01 PM (IST)

    ऑक्सिजनची मागणी 270 वरुन 350 मेट्रिक टनवर गेलीय : राजेश टोपे

    ऑक्सिजनची मागणी 270 वरुन 350 मेट्रिक टनवर गेलीय

    वाढत्या रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत ऑक्सिजनचा वापर कमी

    परिस्थिती अद्याप गंभीर झालेली नाही पण काळजी घेणं गरजेचं

  • 09 Jan 2022 11:18 AM (IST)

    लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ

    लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ झाली आहे , काल  आणखी 114 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 322 रुग्णांवर सध्या जिल्ह्यातल्या कोविड  सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत . काल  2 हजार 673 रुग्णांची तपासणी करण्यात आली  होती. त्यामध्ये 114 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत .  आता पर्यंतच्या एकूण  रुग्णांची संख्या आता 93 हजार 306 वर पोहंचली आहे .

  • 09 Jan 2022 11:10 AM (IST)

    Chandrakant Patil Live : कोरोना नियमांवरुन सर्वसामान्य गोंधळात, सत्यनाश सुरु

    कोरोना नियमांवरुन सर्वसामान्य गोंधळात, सत्यनाश सुरु

    राज्यपालांना विचारलं पाहिजे

    सर्वसहमतीनं निर्णय घ्यावेत,

    शाळा सुरु बंद, कॉलेज सुरु बंद, सर्व गोंधळ सुरु आहे

    उद्धवजींच्या म्हणण्याशी लाखपट सहमत

    वडेट्टीवार चंद्रपूरला एक बोलणार, टोपे जालन्यात एक बोलणार, अजित पवार शुक्रवारच्या बैठकीत एक बोलणार

    तज्ज्ञांना बोलू द्या, तुमचे चार जण बोलून ठरवा

    सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे रांगडे नेते

    दारूची होम डिलिव्हरी काय करता, पिझ्झाची करा ना रे

    गेंडासुद्धा मला भेटून मला म्हणाला, मला त्यांची भाषा कळते, मी जादा संवेदनशील आहे, माझं नाव घेऊ नका, असं गेंडा म्हणत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले

  • 09 Jan 2022 10:43 AM (IST)

    Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढत्या कोरोना रुग्णंसख्येबद्दल आढावा बैठक घेणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढत्या कोरोना रुग्णंसख्येबद्दल आढावा बैठक घेणार आहेत. संध्याकाळी साडे चार वाजता नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत. देशातील वाढती रुग्णसंख्या आणि लसीकरणाचा आढावा नरेंद्र मोदी घेतील. देशभरात 1 लाख 59 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. उद्यापासून बुस्टर डोसचं लसीकरण सुरु होतंय यासंदर्भात नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत.

  • 09 Jan 2022 09:19 AM (IST)

    देशात 1 लाख 59 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण, ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3623 वर

    देशात 1 लाख 59 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण, ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3623 वर

  • 09 Jan 2022 09:18 AM (IST)

    संसदेच्या 400 कर्मचाऱ्यांना कोरोना, सुप्रीम कोर्टातही कोरोनाचा धोका वाढला

    नवी दिल्ली संसदेच्या 400 कर्मचाऱ्यांना कोरोना

    सुप्रीम कोर्टातही कोरोनाचा धोका वाढला

    160 रजिस्ट्रार कोरोना संक्रमित

    सहा न्यायाधीशांनाही कोरोनाची बाधा

    नवी दिल्लीत कोरोनाचे संकट वाढले

  • 09 Jan 2022 08:39 AM (IST)

    15 ते 18 वयोगटातील लसीकरणात पुणे जिल्हा अव्वल

    15 ते 18 वयोगटातील लसीकरणात पुणे जिल्हा अव्वल

    तर ठाणे जिल्हा दूसऱ्या क्रमांकावर,

    आतापर्यंत पुण्यात 5 लाख 53 हजार 331 जणांनी घेतला डोस,

    15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला जिल्ह्यात आला वेग !

  • 09 Jan 2022 08:04 AM (IST)

    नागपूर जिल्हयात आठवडाभरात 2653 नव्या कोरोना रुग्णांची भर

    - नागपूर जिल्हयात आठवडाभरात 2653 नव्या कोरोना रुग्णांची भर

    - जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर पोहोचला 7.5 टक्क्यांवर

    - कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपा प्रशासन अलर्ट मोडवर

  • 09 Jan 2022 07:53 AM (IST)

    नाशिकमध्ये ओमिक्रॉनचे वाढते संकट, जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम सज्ज

    नाशिकमध्ये ओमिक्रॉनचे वाढते संकट

    जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम सज्ज

    संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर प्रशासन एक्शन मोड वर

    सोमवार पासून वॉर रूम होणार कार्यान्वित

    प्रत्येक अधिकाऱ्यावर नियोजनाची जवाबदारी

  • 09 Jan 2022 07:25 AM (IST)

    नागपूर जिल्हयात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ मात्र पाच टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये

    - नागपूर जिल्हयात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढूनही रुग्णालयात फक्त पाच टक्के रुग्ण दाखल

    - गेल्या 24 तासांत 698 नव्या रुग्णांपैकी 37 रुग्ण रुग्णालयात दाखल

    - नागपूरात एकूण सक्रिय रुग्णांपैकी 116 रुग्ण रुग्णालयात दाखल

    - नागपूरातील 7 हजारपेक्षा जास्त बेड रिकामे

    - शहरात एकूण बेडच्या 1.53 टक्केच रुग्ण भरती

  • 09 Jan 2022 06:43 AM (IST)

    Rajesh Narvekar : ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या गृह विलगिकरणात आहेत. कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वास व्यक्त करतानाच गेल्या काही दिवसात  संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

  • 09 Jan 2022 06:18 AM (IST)

    शिवसेना नेते सचिन अहिर यांना कोरोना संसर्ग

    शिवसेना नेते सचिन अहिर यांना कोरोना संसर्ग

Published On - Jan 09,2022 6:16 AM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.