नागपुरात एकाचदिवशी 56 कोरोना रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 682 वर

नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत (Corona Patient increase Nagpur) आहे.

नागपुरात एकाचदिवशी 56 कोरोना रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 682 वर

नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत (Corona Patient increase Nagpur) आहे. काल (5 जून) नागपुरात एकाच दिवसात तब्बल 56 संशयीतांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने नागपुरातील स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली Corona Patient increase Nagpur) आहे.

नागपुरातील नाईक तलाव परिसरातून काल 33 नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच धंतोली, सेमीनरी हिल्स परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या भागातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या आत 682 वर पोहोचली आहे. 25 मे नंतर नागपुरात काल सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर नागपुरात आतापर्यंत 423 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

नुकतेच नागपूरमधील सतरंजीपुरा हा कोरोनोचा हॉटस्पॉट ठरला होता. पण येथील सर्व रुग्ण आता कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या काहीदिवसांमध्ये नागपुरातील सतरंजीपुरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र आता येथील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना

पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच परिसर सील

नागरिकांना क्वारंटाईन करुन फैलाव थांबविणे

संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करणे

परिसरात आरोग्य तपासणी

क्षय रोग तपासणी

गर्भवती महिलांची तपासणी

परिसरात पोलीस आणि एस आरपीएफ तैनात

नागरिकांना बाहेर पडण्यास किंवा त्या भागात कोणाला जाण्यास मज्जाव

संबंधित बातम्या :

नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!

गोरेगाव फिल्मसिटी काम, मुंबई-नागपूर विमानाने प्रवास, चंद्रपुरात पोहोचलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *