AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Corona | कोरोनाची टेस्ट बंधनकारक, पैसे नसल्याने कळवा पालिका रुग्णालयात नोंद, रुग्णालयात जाताना रस्त्यातच प्रसुती

ठाणे शहरातील जे नॉन-कोविड रुग्णालयं आहेत, तिथे उपचारासाठी येणाऱ्यांसाठी कोरोनाची टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

Thane Corona | कोरोनाची टेस्ट बंधनकारक, पैसे नसल्याने कळवा पालिका रुग्णालयात नोंद, रुग्णालयात जाताना रस्त्यातच प्रसुती
| Updated on: May 25, 2020 | 4:11 PM
Share

ठाणे : कोरोनाचा फटका हा फक्त कोरोनाबाधित (Woman Deliver Baby On Road) रुग्णांनाच नाही, तर इतर सामान्य रुग्णांनाही बसताना दिसत आहे. कोरोना नसलेल्या रुग्णांच्या उपचारात अडथळे येत आहेत. याचा सर्वाधिक त्रास गर्भवती महिलांना होत आहे. ठाण्यात एका गर्भवतीवर रस्त्यावरच बाळाला जन्माला घालण्याची (Woman Deliver Baby On Road) वेळ आली.

ठाणे शहरातील जे नॉन-कोविड रुग्णालयं आहेत, तिथे उपचारासाठी येणाऱ्यांसाठी कोरोनाची टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. याचा मोठा त्रास इतर उपचार घेणाऱ्या रुग्णांना होत आहे. याचा सर्वाधिक फटका हा गरोदर महिलांना बसत असून त्यांना देखील प्रसुतीपूर्वी कोरोनाची टेस्ट बंधनकारक केली जात आहे.

मुंब्र्यात एका महिलेने मुंब्र्यातीलच एक खाजगी रुग्णालयात प्रसुतीसाठी नाव नोंदवले होते. मात्र, 7 दिवसांपूर्वी आधी कोरोनाची टेस्ट करुन घ्या त्यानंतरच प्रसुती होईल, असे या खाजगी रुग्णालयाने सांगितले. मात्र, कोरोना टेस्टसाठी 3 ते 4 हजार रुपये लागतात. इतके पैसे नसल्याने अखेर या कुटुंबाने पालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काल अचानक या महिलेला त्रास सुरु झाला. वाहनांची व्यवस्था नासल्याने कळवा हॉस्पिटलला पोहोचण्या आधीच मुंब्र्यातच (Woman Deliver Baby On Road) या महिलेची रस्त्यात प्रसुती झाली.

प्रसुती झाल्यानंतर महिलेचे नातेवाईक कोणी डॉक्टर मिळतो का याचा शोध घेत होते. तेव्हा त्यांच्या मदतीला नूर हॉस्पिटलमधील डॉक्टर धाऊन आले. त्यांनी त्यांच्याच रुग्णालयातील परिचारिकेला बोलावले आणि बाळाची अडकलेली नाभी बाहेर काढली. या डॉक्टर आणि नर्सने कोरोनाचा विचार न करता रस्त्यावर प्रसुती करुन माणुसकीचे दर्शन घडवले.

या महिलेकडे टेस्टसाठी पैसे नसल्याने तिने खाजगी रुग्णालय सोडून कळवा रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये खूप उशीर झाला. आम्ही जीव धोक्यात घालून कोरोनाचा विचार न करता प्रसुती केली. मात्र, शासनाने गरोदर महिलांवर ही वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवे, असे नूर हॉस्पिटलचे डॉक्टर इम्रान यांनी (Woman Deliver Baby On Road) सांगितले.

संबंधित बातम्या :

कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर, 24 तासात 6977 नवे रुग्ण

Pune Corona | पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या 6,823 वर, कुठल्या जिल्ह्यात किती रुग्ण?

महाराष्ट्रातून विमान उड्डाणाला अखेर हिरवा कंदील, मुंबईतून प्रवासी विमानाचे टेक ऑफ

किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.