AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबी थंडीत नाशिकमध्ये राजकीय धग; निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रयोग जोरात

गुलाबी थंडीत नाशिकमधले राजकीय वातावरण मात्र चांगलेच पेटले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पक्षांतराचे प्रयोग सुरू झाल्याने येणाऱ्या काळात यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

गुलाबी थंडीत नाशिकमध्ये राजकीय धग; निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रयोग जोरात
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 28, 2021 | 11:18 AM
Share

नाशिकः गुलाबी थंडीत नाशिकमधले राजकीय वातावरण मात्र चांगलेच पेटले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पक्षांतराचे प्रयोग सुरू झाल्याने येणाऱ्या काळात यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होत आहे. सध्या नाशिक महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. सध्याच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. मात्र, कालच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता 122 वरून थेट 133 वर नेण्यात आली आहे. नगरसेवकांची संख्या वाढचा राजकीय परिणाम अनेकांना महाग पडू शकतो. अशा वातावरणात आता पक्षांतराचे प्रयोग जोरात सुरू आहेत.

नगरसेवक बग्गांचा राजीनामा

नाशिक महापालिकेती राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी अपक्ष नगरसेवक गुरुमितसिंग बग्गा यांनी बुधवारी राजीनामा दिला आहे. बग्गा हे मुळचे काँग्रेसचे आहेत. आता ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. येत्या दोन दिवसांत मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यांच्यासोबत अपक्ष नगरसेवक विमल पाटील आणि मुशीर सय्यदही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेस शहराध्यक्षपद मिळण्याची शक्यता

नाशिकच्या काँग्रेसमध्ये माजी आमदार जयप्रकाश छाजेड आणि त्यांच्याविरोधातला गट प्रबळ आहे. या दोन्ही पैकी कोणत्याही एका गटाला शहराध्यक्षपद मिळाले की, त्यावरून राजकीय सुंदोपसुंदी रंगते. सध्या काँग्रेस शहराध्यक्षपदी शरद आहेर आहेत. मात्र, त्यांची काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी बढती झाल्याने ते प्रभारी म्हणून काम पाहतात. आता त्या जागेवर बग्गा यांना संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. बग्गा 1997 काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला. 2007 मध्ये पुन्हा स्वीकृत सदस्य झाले. त्यानंतर दोन वेळा ते पुन्हा निवडून आले आहेत. विशेष म्हणजे अपक्ष म्हणून त्यांनी उपमहापौरपदही भूषविले आहे.

भाजपातही शहराध्यक्षपद बदलाची चर्चा

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येही राजकीय बदलाची चर्चा सुरू होती. त्यात शहराध्यक्षपदासाठी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते, हिमगौरी आडके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सध्या गिरीश पालवे हे शहराध्यक्ष आहेत. दुसरीकडे भाजपन नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी नुकत्याच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांचेही तळ्यात मळ्यात सुरू असल्याचे समजते.

शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीची तयारी जोरात

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेही जोरात तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः राज ठाकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही नाशिकचा दौरा करत कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलही नाशिकच्या दौऱ्यावर येते. सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे पाहायला दिसते आहे.

इतर बातम्याः

आनंदवार्ताः नाशिक-सुरत विमानसेवा 1 नोव्हेंबरपासून, दिल्लीसाठीही लवकरच मुहूर्त

CCTV VIDEO | नाशकात शालेय मुलांची रस्त्यात हाणामारी, तलावात बुडवून विद्यार्थ्याची हत्या

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश