सीआरपीएफच्या त्या ताफ्यात असलेले साताऱ्यातील जवान सुखरुप, सध्या उपचार सुरु

सातारा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले, ज्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचाही समावेश आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान सुशांत वीर या हल्ल्यातून बचावले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून ते सुखरुप असल्याचं कळवण्यात आलंय. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या रुई गावचे सुपुत्र सुशांत वीर पुलवामा येथे घडलेल्या आत्मघाती हल्ल्यात जखमी झाले. […]

सीआरपीएफच्या त्या ताफ्यात असलेले साताऱ्यातील जवान सुखरुप, सध्या उपचार सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

सातारा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले, ज्यामध्ये महाराष्ट्रातील दोन जवानांचाही समावेश आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान सुशांत वीर या हल्ल्यातून बचावले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून ते सुखरुप असल्याचं कळवण्यात आलंय.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या रुई गावचे सुपुत्र सुशांत वीर पुलवामा येथे घडलेल्या आत्मघाती हल्ल्यात जखमी झाले. त्यांच्यावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेची माहिती सुशांत यांच्या गावी कुटुंबाला समजल्यानंतर कुटुंब चांगलंच हतबल झालंय.

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार येऊन आदळली. ज्या बसवर ही कार आदळली, त्या बससह इतर बसमधीलही काही जवान शहीद झाले, तर काही जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये सुशांत वीर यांचाही समावेश आहे. दोन दिवसानंतर शनिवारी सुशांत यांनी रुई येथील कुटुंबीयांशी संपर्क साधून आपण सुखरूप असल्याचं सांगितले आणि कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्चास टाकला.

सुशांत हे 2009 ला सीआरपीएफमध्ये भरती झाले. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण रुई गावात झाले असून 12 वी पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण कोरेगावला झालं. पहिल्यापासून सैन्यात जाण्याची आवड असल्यामुळे सुशांत हे बारावीत असतानाच भरती झाले.

सुरुवातीला दिल्लीत तीन वर्षे, श्रीनगरमध्ये तीन वर्षे आणि छत्तीसगडमध्ये सहा वर्षे त्यांनी सेवा बजावली. ते सध्या श्रीनगरमध्ये सोल्जर जीडी म्हणून कार्यरत आहेत. साताऱ्यातील रुई गावी आई, वडील, पत्नी दोन मुली आणि दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. त्यांचे भाऊही सैन्यदलात आहेत.

सुशांत वीर हे आपली 9 फेब्रुवारीपर्यंतची सुट्‍टी संपवून सेवेसाठी पुन्हा रूजू होण्यासाठी गेले होते. यावेळी ते 11 फेब्रुवारी रोजी जम्मूमध्ये पोहोचले. रस्ते बंद असल्याने ते तेथेच लष्करी छावणीत थांबले. 14 फेब्रुवारी रोजी लष्करी वाहनातून जात असताना दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार लष्‍करी ताफ्‍यातील बसला आदळवून स्‍फोट केला.

ज्या बसला कार धडकवली तेथून काही अंतरावरील पाठीमागच्या बसमध्ये सुशांत वीर होते. हा स्‍फोट इतका मोठा होता की, धडकलेल्‍या बसची विचित्र अवस्था झाली होती. तर सुशांत ज्‍या पाठीमागच्या गाडीत बसले होते त्‍या गाडीच्या काचा फुटल्या. शिवाय लोखंडी पत्रा हा ज्वालाग्राही झाल्याने त्‍यात ते जखमी झाले. त्‍यांच्यावर जम्‍मू काश्मीरमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी सुशांत यांनी आपण सुखरूप असल्‍याचं कुटुंबीयांना कळवलं.

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.