AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dattatray Bharne | 'Harshvardhan Patil यांची एवढी संपत्ती आभाळातून आली आहे का?'

Dattatray Bharne | ‘Harshvardhan Patil यांची एवढी संपत्ती आभाळातून आली आहे का?’

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 5:36 PM
Share

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुमची एवढी संपत्ती आभाळातून आलीय का? मला कुणावर वैयक्तिक पातळीवर बोलायचे नाही, अशी तिखट प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी पाटील यांच्यावर केली आहे.

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुमची एवढी संपत्ती आभाळातून आलीय का? 1995अगोदर तुमची काय परिस्थिती होती, हे संपूर्ण इंदापूरकरांना (Indapur) माहिती आहे. जर बोलायला लागलो तर तुमची वाचा बंद होईल. माझ्याकडे तुमचा सगळा मसाला आहे, मात्र मला कुणावर वैयक्तिक पातळीवर बोलायचे नाही, अशी तिखट प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी पाटील यांच्यावर केली आहे. इंदापूर तालुक्यातील गोखळी यागावी विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी भरणे बोलत होते. आठ मार्च रोजी झालेल्या रस्ता रोको आंदोलनात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भरणे हे कमिशन एजंट आहेत. त्यांच्या गाडीत ठेकेदार बसलेले असतात, तेराशे कोटी विकास निधी आणला, असे म्हणता पण त्यातील तुमचा हिस्सा किती, तुमच्या घरचा वॉल कंपाऊंडचा हिस्सा किती, असे गंभीर आरोप यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर केले होते.
Published on: Mar 19, 2022 05:34 PM