डिलिमिटेशन विधेयकावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत..

डिलिमिटेशन विधेयकावर जोरदार चर्चा सुरू आहे. सोमवारी संसदेत हे विधेयक मांडले जाईल. त्यातच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाचे समर्थन केले.

डिलिमिटेशन विधेयकावर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत..
Eknath Shinde
| Updated on: Nov 28, 2026 | 2:10 PM

डिलिमिटेशन बिलावरून मोठा वाद सुरू आहे. इंडिया आघाडीने या बिलाविरोधात भूमिका घेतली. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीकडे पवारांच्या एनसीपीने पाठ फिरवली. शरद पवारांच्या पक्षाचा एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहिला नाही. डिलिमिटेशन बिलला सरकारला पाठिंबा पवारांचा पक्ष देणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. पण त्यावर सावध भूमिका घेताना सुप्रिया सुळे दिसल्या. आज एकही पवारांच्या पक्षाचा खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पोहोचला नाही. त्यामुळे या विधेयकाला त्यांचा पक्ष पाठिंबा देत असल्याचे स्पष्टच आहे. अनेक पक्षांनी या विधेयकासाठी सरकारला पाठिंबा दिला. 30 सप्टेंबर 2026 रोजी संसदेत हे विधेयक सादर केले जाईल. त्यापूर्वीच इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचे बघायला मिळत आहे.

हे डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकाच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा देणारी पोस्ट शिंदेंनी शेअर केली. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील नवा सुवर्णअध्याय..

Loading...

भारतीय लोकशाही खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर मतदारसंघांची पुनर्रचना ही काळाची गरज आहे. या प्रक्रियेमुळे प्रत्येक राज्यातील जागा 50 टक्क्यांनी वाढणार असल्याने कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही. मतदारसंघांचा आकार सुटसुटीत झाल्यास लोकप्रतिनिधींना शेवटच्या घटकापर्यंत थेट पोहोचणे शक्य होईल आणि विकासकामांचा वेग दुपटीने वाढेल.

याच ऐतिहासिक प्रक्रियेतून ‘नारी शक्ती वंदन कायद्या’अंतर्गत महिलांना 33 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होणार असून, संसदेत महिलांना त्यांचा हक्काचा आवाज मिळणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या खंबीर नेतृत्वात उचललेले हे पाऊल केवळ राजकीय निर्णय नसून, महिला सक्षमीकरण आणि देशाच्या प्रगतीला निर्णायक दिशा देणारी क्रांती आहे.संकुचित राजकारण आणि पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राष्ट्रहित सर्वतोपरी मानून आपण या ऐतिहासिक निर्णयाला एकमताने साथ देऊया आणि भारतीय लोकशाही अधिक भक्कम करूया..

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us