अन्याय होऊ देणार नाही, तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे; प्रदीप पूर्णेकर प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा राम पूर्णेकरांना शब्द

Devendra Fadnavis Meet Ram Purnekar: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राम पूर्णेकरांना शब्द दिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेतली आहे.

अन्याय होऊ देणार नाही,  तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे; प्रदीप पूर्णेकर प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा राम पूर्णेकरांना शब्द
| Updated on: Oct 16, 2026 | 10:47 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात उपस्थिती लावली होती. त्यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. यावेळी प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील महत्त्वाची घडामोड घडली. या प्रकरणात राम पूर्णेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्‍यांनी एक शब्द दिला आहे. आमदार संजय केळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून ही भेट घडवून आणण्यात आली होती. यानंतर आता चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम पूर्णेकर यांना धीर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. तुझ्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी राम पूर्णेकर यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात न्याय मिळावा, या अपेक्षेने मुख्यमंत्री आणि राम पूर्णेकर यांच्यात झालेल्या भेटीकडे लक्ष लागले आहे.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात टेंभी नाका येथील देवीच्या दर्शनासाठी आले असताना राम पूर्णेकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत हत्या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याचे समजते. प्रकरणातील पुढील तपास, न्यायप्रक्रिया आणि कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द महत्त्वाचा मानला जात आहे. राम पूर्णेकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा भेट होणार आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा भेट घेण्याचे ठरले आहे.

या पुढील भेटीत प्रकरणासंदर्भात कोणती चर्चा होते आणि त्यानंतर काय पावले उचलली जातात, याकडे लक्ष असेल. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राम पूर्णेकर यांना दिलेल्या आश्वासनानंतर या प्रकरणात पुढे काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रदीप पूर्णेकरांची हत्या झाली आहे. या हत्येचा आरोप मिनाक्षी शिंदेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच काही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us