गोरे होण्याच्या नादात ट्रेनी डॉक्टर जीवाला मुकला?, झोपेतच गेले प्राण…
गोरे होण्यासाठी अनेकजण निरनिराळी कॉस्मेटिक्स वापरत असतात. एका शिकाऊ डॉक्टरने गोरे होण्यासाठी घेतलेल्या औषधाचा हेव्ही डोस त्याला चांगलाच भारी पडल्याची घटना घडली आहे.

स्वप्नील उमप, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : रंग उजळ होण्यासाठी एरव्ही महिलांपासून पुरुषही हल्ली विविध सौदर्य प्रसाधनांचा वारेमाप वापर करत असतात. अख्खी सौदर्य प्रसाधनांची इंडस्ट्री या रंग उजळ करण्याच्या धंद्यात उतरलेली आहे. परंतू खरे सौदर्य हे रंगात नसून तुमच्या गुणात आणि व्यक्तीमत्वात असतानाही लोक या वरलिया रंगाला भुलत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार एका ट्रेनी डॉक्टरच्या बाबतीत घडला आहे.
रंग गोरा होण्याच्या नादात आता एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरने औषधांचा ओव्हरडोस घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा अमरावती येथे घडली आहे. या ट्रेनी डॉक्टररे रंग गोरा होण्यासाठी औषधांचा ओव्हरडोस जीवघेणा ठरला आहे. अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे शिकाऊ डॉक्टर आदित्य रावटे ( वय २२ वर्ष ) याचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणात त्याच्या आईने आपला मुलगा गोरं होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांतून एकदा सलाईनद्वारे इंजेक्शन घेत होता अशी कबुली दिली आहे.
औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा?
आदित्यच्या आईने आपल्या मुलाने गोरे होण्यासाठी या आधीही अशाच प्रकारची इंजेक्शन घेतली होती. त्यावेळी त्याला चांगला रिझल्ट मिळाला होता. मात्र, त्याने दोन दिवसाआधी रात्री घरी आल्यानंतर जेवणे केले आणि सलाईनद्वारे पुन्हा इंजेक्शन घेतले. तेव्हा तो आम्हाला मृतावस्थेत आढळला. त्याचे शरीर पूर्णपणे काळे, हिरवे झाले होते. त्यामुळे त्याला इंजेक्शनचा ओव्हरडोस झाला असावा असा आमचा अंदाज आहे असेही त्याच्या आईने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोस्टमार्टेमनंतर खरे कारण समजेल असे म्हटले जात आहे.