AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, तानाजी सावंतांच्या OSD चा होता दबाव? स्टेशनवरच…

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, तानाजी सावंतांच्या OSD चा होता दबाव? स्टेशनवरच...
Dr Rajendra Rupnawar Death news Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 31, 2026 | 7:51 PM
Share

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रूपनवर यांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूचे थेट कनेक्शन शिवसेना नेते आणि माजी तानाजी सावंत यांच्या पीएशी जोडले जात आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तानाजी सावंत यांच्या पीएने दिली धमकी?

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद कोंडे देशमुख यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्याकडूनही आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. रूपनवर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 29 ऑगस्ट रोजी आत्महत्येबाबत इशारा दिला होता अशी माहितीही समोर आली आहे.

डॉ. रूपनवर यांचा व्हिडिओ समोर

डॉ. रूपनवर यांचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात त्यांनी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. कारण डॉक्टर मदने मॅडम यांच्यावर अजूनही कारवाई झालेली नाही. जो चौकशी समितीचा अहवाल आहे तो माझ्यापासून लपवला जात आहे. अहवाल वर पाठवला असं सांगितला जात आहे, मात्र मला तो दाखवला जात नाही. या सर्व प्रकरणामागे डॉक्टर भगवान पवार हे आहेत. त्याचे पितळ उघडे पडेल म्हणून त्यांना वाचवले जात आहे. त्यांचे आरोपी प्रसाद कोंडेसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत हे समोर येईल म्हणून त्यांना वाचवले जात आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर आधी सांगितल्याप्रमाणे 29 ऑगस्ट 2026 रोजी मी आत्महत्या करेल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा