प्रितम मुंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल, बीड ते परळी मुंडे भगिनींचं शक्तीप्रदर्शन

बीड : भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप-रयत क्रांती महायुतीच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार प्रितम मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह सहकुटुंब श्री वैद्यनाथांचं दर्शन घेतलं, त्यानंतर पांगरी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आले होते. शिवाय …

प्रितम मुंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल, बीड ते परळी मुंडे भगिनींचं शक्तीप्रदर्शन

बीड : भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप-रयत क्रांती महायुतीच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार प्रितम मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंसह सहकुटुंब श्री वैद्यनाथांचं दर्शन घेतलं, त्यानंतर पांगरी येथील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आले होते. शिवाय मुंडे समर्थकांनीही मोठी गर्दी केली होती.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, यांच्यासह मुंडे कुटुंबीयांची उपस्थिती होती. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून मुंडे भगिणींचं स्वागत करण्यात आलं. परळी ते बीड या मार्गावर जनतेचे आशीर्वाद घेत मुंडे भगिणी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या.

माझा विजय निश्चित – प्रितम मुंडे

भाजपने उमेदवारी जाहीर केल्यापासून बीड जिल्ह्यातील मतदारात आनंदाचे वातावरण आहे. भाजप समवेत सर्वच घटक पक्ष असल्याने माझा विजय निश्चित आहे, शिवाय मी केलेल्या विकासकामांसाठी बीडची जनता मला पुन्हा एकदा संधी देईल, अशी प्रतिक्रिया प्रितम मुंडे यांनी दिली.

आमचा उमेदवार स्वच्छ आहे- दानवे 

प्रितम मुंडे या स्वच्छ प्रतिमेच्या आहेत, त्यांचं कामही चांगलं आहे. त्यामुळे आमचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. राज्यातील 45 पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील, असं सांगत आ विनायक मेटे यांना महायुतीत राहायचे असेल तर मेटे यांना बीडमध्येही काम करावेच लागेल, असा सज्जड इशारा दानवे यांनी दिला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंसह इतर नेते उपस्थित होते.

पाहा – माझी आई पुन्हा जिंकू दे, प्रितम मुंडेंचा मुलगा आजोबांच्या चरणी लीन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *