मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ; एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बने राजकीय वातावरण तापलं आहे. जरांगेंच्या आरोपावर शिंदेंच्या जवळच्या माणसाने मोठी मागणी केली आहे.

मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ; एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
manoj jarange patil news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 1:28 PM

मनोज जरांगे यांनी बीडमधील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनोज जरांगे यांच्या 500 कोटींच्या बॉम्बने राजकारण ढवळून निघालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही पुरावे सादर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याला हादरवणारे पुरावे दिले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर आता एकनाथ शिंदे यांचे जवळच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यानी मनोज जरांगे यांना फॉरेन्सिककडे तक्रार करण्याचा सल्ला देत चौकशीची मागणी केली आहे.

खासदार नरेश म्हस्के यांची ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी 

Loading...

खासदार नरेश म्हस्के म्हणाले, ‘मनोज जरंगे यांनी फॉरेन्सिककडे तक्रार करावी. यामध्ये कोण लोक आहेत, त्याची चौकशी करण्याची मागणी करावी.  त्यांनी मागणी केल्यावर राज्य सरकार त्याची चौकशी करेल. एकनाथ शिंदे हे कोणाच्या विरोधात ही लढायला सांगत नाहीत. त्यांचा तो स्वभाव नाही. मनोज जरांगे यांचा कायम आम्ही आदर करत आलो आहोत. आता या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जावी, अशी आमची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे जर त्यांच्यावर कोणी बोलला, तर आरे ला का रे.. आम्ही करणारच. ते आम्हाला शिंदे साहेब सांगत नाही. या सगळ्या ऑडियो क्लिपची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे’.

निलेश राणे यांची पोस्ट जशीच्या तशी 

आमदार निलेश राणे यांनीही मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली. निलेश राणे म्हणाले,’कोणीतरी बोलणार एकाकडून घेऊन दुसऱ्याला ५०० करोड दिले म्हणजे पुरावा झाला?  रोज आमच्या कोकणाच्या कुठल्या ना कुठल्या टीट्यावर अमुकाने पैसे घेतले आणि अमुकाने पैसे दिले असे रोज चर्चा होतात, त्याचा बोलणाऱ्याला पण फरक पडत नाही आणि ऐकणाऱ्याला पण कारण कोणाकडून तरी ऐकलेलं असते. जरांगे पाटील जरातरी माणुसकी आणि लाज स्वतःमध्ये जिवंत असायला पाहिजे होती’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us