AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मनोज जरांगेंचीही ऑडिओ क्लिप, गुप्त मिटिंग… थेट एकनाथ शिंदेंविरोधात… बड्या नेत्याचा दावा; महाराष्ट्र हादरला

मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ उडवली आहे, ज्यात भाजप षडयंत्र आणि एकनाथ शिंदे यांना ५०० कोटींचा आरोप आहे. याला प्रत्युत्तर म्हणून रामदास कदम यांनी जरांगेंच्याच गुप्त मिटिंगची क्लिप असल्याचा दावा केला, ज्यात शिंदे समर्थकांना 'चमचे' म्हटले होते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे, विशेषतः मराठा आरक्षणाभोवती राजकारण तापले आहे.

आता मनोज जरांगेंचीही ऑडिओ क्लिप, गुप्त मिटिंग... थेट एकनाथ शिंदेंविरोधात... बड्या नेत्याचा दावा; महाराष्ट्र हादरला
Manoj JarangeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 1:05 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 32 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप ऐकवून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगेंच्या विरोधात भाजपचे लोक षडयंत्र रचताना दिसत आहेत. तसेच जरांगेंना मॅनेज करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचंही म्हटलं गेलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जरांगेंनी दिवाळीपूर्वीच फटाके फोडून शिंदे गटातही खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडेही मनोज जरांगे यांच्या गुप्त मिटिंगची ऑडिओ क्लिप आहे, असा दावा रामदास कदम यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

माजी मंत्री रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. माझ्याकडेही तुमची एक क्लिप आली. तुमच्या गोपनीय मिटिंगची ही ऑडिओ क्लिप आहे. या मिटिंगमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्या आमदाराचं मी नाव घेत नाही. या मिटिंगमध्ये निम्म्यांपेक्षा जास्त एकनाथ शिंदेंचे चमचे बसले आहेत, असं तुम्ही म्हणाला होता. माझ्याकडे ती क्लिप आहे. मी कधीच हवेत बोलत नाही. हवेत तलवार चालवत नाही. मी जबाबदारीने बोलतो. त्यात इंगळे नावाचे व्यक्ती होते. त्यांनी तुम्हाला शिंदेंच्या विरोधात बोलण्यापासून रोखलं. असं बोलणं ठिक नाही, असं हे इंगळे म्हणाले. हवं तर तुम्ही तपासून घ्या. तुमची गोपनीय मिटिंगही बाहेर आली आहे. भाजपच्या आमदारांना सोबत घेऊन शिवसैनिकांना तुम्ही एकनाथ शिंदेंचे चमचे म्हणत असाल तर शिंदेंबाबत तुमची भूमिका काय आहे? हे स्पष्ट केलं पाहिजे, असं आव्हानच रामदास कदम यांनी दिलं आहे.

कुऱ्हाडीचा दांडा, गोतास…

तुम्ही एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलत आहात. याचा अर्थ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ असं आम्ही समजायचं का? आमचा मराठा समाजाचा नेताच आमच्या मराठा समाजाच्या नेत्याला संपवतोय असं म्हणायचं का? माझी हात जोडून विनंती आहे, असं करू नका. छत्रपती शिवाजी महाराज असताना मराठे एकत्र झाले नव्हते. छत्रपतींना मराठ्यांच्या विरोधात अनेक लढाया लढाव्या लागल्या. सुदैवाने तुमच्या मागे मोठा समाज उभा आहे. तुम्ही समाजात फूट पडेल असं करता कामा नये, असं कदम म्हणाले.

मला दु:ख झालं

तुमच्या गुप्त मिटिंगमध्ये भाजपचा आमदार बसला आणि तुम्ही तिथे शिंदेंचे चमचे बसले म्हणता? मला दु:ख झालं. खूप वाईट वाटलं. माझी विनंती आहे, तुम्ही मुंगी होऊन साखर खा. तुम्ही आज पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा सन्माजनक उल्लेख केला. एकनाथजी, देवेंद्रजी बोलला. बरं वाटलं. आपल्या राज्याची संस्कृती अशीच वेगळी आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...