AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंना पर्सनल टार्गेट करा, विधानसभेत फायद्याचा थर्ड फ्रंट… 5 व्या ऑडिओ क्लिपमधला सनसनाटी प्लान उघड

मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या कथित राजकीय षडयंत्राची ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. यामध्ये जरांगे यांना विधानसभेत भाजपविरोधात 'थर्ड फ्रंट' म्हणून वापरण्याचा आणि फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा कट रचल्याचे स्पष्ट ऐकू येते. या क्लिपमधील संभाषणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे.

जरांगेंना पर्सनल टार्गेट करा, विधानसभेत फायद्याचा थर्ड फ्रंट... 5 व्या ऑडिओ क्लिपमधला सनसनाटी प्लान उघड
Manoj JarangeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 12:20 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फोडले आहेत. जरांगे यांनी आज कथित ऑडिओ क्लिप मीडियाला ऐकवली आहे. त्यात मनोज जरांगेंच्या विरोधात भाजपकडून कसं षडयंत्र रचंल जातंय हे स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. मनोज जरांगे हे फडणवीस आणि भाजपला कसं टार्गेट करतील ते पाहा. कारण विधानसभेत आपल्याला त्याचा फायदाच होईल. जरांगे हे निवडणुकीतील आपले थर्ड फ्रंट असतील, असा प्लानच या क्लिपमध्ये चार पाच लोक रचताना दिसत आहेत. यात एक महिलाही आहे. जरांगे यांनी ही क्लिप ऐकवल्याने महाराष्ट्र हादरून गेला आहे. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही.

5व्या क्लिपमध्ये काय म्हटलंय?

या क्लिपमध्ये एक महिला बोलताना दिसत आहे. जरांगेंचं पर्सनल टार्गेट देवेंद्र फडणवीस आणि भाजप राहील, हे पाहिलं पाहिजे. बाकी विधानसभेत तो आपल्या फायद्याचा थर्ड फ्रंट बनू शकतो. त्यामुळे जरांगेंना पर्सनल टार्गेट कसं करता येईल, हे आपण पाहिलं पाहिजे. जे कामाचे विषय नाही, त्याकडे लक्ष नको द्यायला. पण त्याकडेच आपण लक्ष देत आहोत. जे कामाचे विषय आहेत, त्याकडे आपण पाहत नाही. श्रीरामपूरमध्ये एका एससी मुलीचं धर्मांतर केलं आहे. त्यावर अजून कोणी आवाज उठवला नाही. हे विषय पोलरायजेशन करणारे आहे. ते आपण पाहिले पाहिजे. आपल्याला असे विषय मोठे केले पाहिजे, असं ही महिला म्हणताना दिसत आहे.

त्यावर पहिला व्यक्ती उत्तर देतो. जरांगे आपल्याविरोधात बोलत आहे. आपल्याविरोधात आरोप करत आहे. त्यांना आपल्यातीलच लोक मदत करत आहे. आपले भाजपचे नेते मदत करत असल्याचं दिसत आहे. माझ्याकडे तशी माहिती आली आहे. आपलं काम थर्ड फ्रंटसाठी सुरू आहे की फडणवीसांना बदनाम करण्यासाठी सुरू आहे? हा चर्चेचा विषय नाही. माहिती देतो. श्रीरामपूरचा विषय कळला. संभाजीनगरचा एक विषय आहे. त्यावर कुणीच मत व्यक्त केलं नाही, असं हा व्यक्ती म्हणताना दिसत आहे.

आपल्याविरोधात मोठं षडयंत्र

दरम्यान, यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या विरोधात मोठं षडयंत्र का रचलं जातं? पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याचा शोध घ्यायला हवा. मी शिंदेंनी मागितल्याप्रमाणे पुरावे दिले आहेत. आता त्याचा शोध घ्या. आपण चांगलं काम करत असताना किती वाईट संकटाला सामोरे जावं लागतं हे महाराष्ट्र पाहत आहे. हे किती भयंकर आहे? यात मोदींनी लक्ष दिलं पाहिजे. फडणवीस यांनी लक्ष दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनीही लक्ष दिलं पाहिजे, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

Follow Us
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...