मोठी बातमी! काँग्रेसमधून बड्या नेत्याची तडाकाफडकी हकालपट्टी, हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आदेशच काढला, राजकारणात खळबळ

रजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, काँग्रेसमधून नेत्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदेश दिले होते. त्यानंतर या नेत्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! काँग्रेसमधून बड्या नेत्याची तडाकाफडकी हकालपट्टी, हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आदेशच काढला, राजकारणात खळबळ
harshvardhan sapkal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 4:39 PM

काल विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दिवसभरात अनेक घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती, परंतु ही बंडखोरी मोडून काढण्यात शेवटच्या दिवशी महायुतीला मोठं यश आलं. तर काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले. दरम्यान दुसरीकडे मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी पक्षनेतृत्वाला विश्वासात न घेताच परस्पर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अशा उमेदवारांवर आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

कोकणातील रायगड -रत्नागिरी -सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते  बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी देखील ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटानंतर काँग्रेसने देखील निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या उमेदवाराची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसने  वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पक्षातून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी शैलेश अग्रवाल यांना निष्कासित करावे, अशी मागणी केली होती, त्यानुसार आता  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून . शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसकडून निवडणुकीतून माघर घेतलेल्या उमेदवारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. शैलेश अग्रवाल यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

 

Follow Us