दरवाजा बंद केला अन् 19 वर्षीय तरुणाने पिस्तुल घेऊन थेट…बारामतीमध्ये रक्ताचा सडा!

बारामतीमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा संबंध एका प्रेमसंबंधाशी असल्याचे बोलले जाते. त्याच्यासोबतच्या प्रेमसंबधाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यानंतर तणावात आलेल्या 19 वर्षीय तरुणाने थेट गोळी झाडून घेतल्याचे बोलले जात आहे.

दरवाजा बंद केला अन् 19 वर्षीय तरुणाने पिस्तुल घेऊन थेट...बारामतीमध्ये रक्ताचा सडा!
baramati death
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 13, 2026 | 4:23 PM

Baramati Extramarital Case : आजकाल विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या प्रेम संबंधांचा शेवट भयंकर झाल्याची अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत. काही ठिकाणी तर पत्नीचे प्रेमप्रकरण समोर आल्याने पतीने थेट हत्याकांड रचल्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी अनैतिक संबंधातून महिलेने घरंच सोडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, सध्या बारामतीमध्ये अनैतिक संबंधाचा शेवट खूपच भयानक झाला आहे. अवघ्या 19 वर्षाच्या तरुणाने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण का घडले असे विचारले जात असतानाच धक्कादायक कारण समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूर्यनगरीत एका युवकाने डोक्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेतली. अविष्कार ढोले असे त्या युवकाचे नाव आहे. यामध्ये युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एमआयडीसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवले होते. परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली. हा युवक शिक्षणासाठी सूर्यनगरीतील एका अपार्टमेंट मध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपार्टमेंटमध्येच त्याने डोक्यात गोळी झाडून घेतली. त्याच्याकडे पिस्तुल कुठून आली याची सर्व माहिती पोलीस घेत आहेत. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

प्रेमसंबंधातून तणाव; म्हणून जीवन संपवले

दरम्यान, बारामतीमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा संबंध एका प्रेमसंबंधाशी असल्याचे बोलले जाते. त्याच्यासोबतच्या प्रेमसंबधाची माहिती महिलेच्या पतीला समजल्यानंतर तणावात आलेल्या 19 वर्षीय तरुणाने थेट गोळी झाडून घेतल्याचे बोलले जात आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us