AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्या, सांगा पाहू काँग्रेसने किती जागा जिंकल्या? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोचक टोला, त्या एक्स पोस्टमध्ये काय?

PM Narendra Modi on Congress: देशातील उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यातील एकूण 28 विधान परिषद जागांसाठी मतपत्रिकेवर निवडणूक झाली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला डिवचले आहे.

बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्या, सांगा पाहू काँग्रेसने किती जागा जिंकल्या? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोचक टोला, त्या एक्स पोस्टमध्ये काय?
सांगा पाहू, काँग्रेसने किती जागा जिंकल्या? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिवचले
| Updated on: Oct 29, 2026 | 7:22 AM
Share

PM Narendra Modi on Congress: देशातील चार राज्यांमध्ये ऑक्टोबरच्या अखेरीस निवडणूक होऊन निकाल लागला. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यातील एकूण 28 विधान परिषद जागांसाठी मतपत्रिकेवर निवडणूक झाली. या निवडणुकीतील निकालावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाला जबरी टोला लगावला आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील काही पक्षांनी बाजी मारली असली तरी काँग्रेसला सरस कामगिरी दाखवता आलेली नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही पक्षाचा तिथे धुव्वा उडाला आहे. त्यावरून आता पीएम मोदी यांनी काँग्रेसला डिवचले आहे.

सांगा पाहू काँग्रेसने किती जागा जिंकल्या?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात, ” चार मोठ्या राज्यातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक विधान परिषदेच्या 28 जागांवर निवडणूक झाली. ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली. सांगा पाहू काँग्रेसने किती जागा जिंकल्या?” असा खोचक टोला पीएम नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. या तीन ते चार ओळीच्या पोस्टमधून मोदी यांनी काँग्रेसला डिवचले आहे.

देशभरातील पदवीधऱ आणि शिक्षक मतदारसंघातील हाती आलेले निकाल काय?

देशातील उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यातील एकूण 28 विधान परिषद जागांसाठी मतपत्रिकेवर निवडणूक झाली. त्यातील काही निकालांची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. पण निकाल कुणाच्या बाजूने लागला हे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर जागांचा निकाल

नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी (काँग्रेस)

अमरावती शिक्षक मतदारसंघ – किरण सरनाईक (शिवसेना)

छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर – डॉ. प्रतापसिंह पाटील (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे पदवीधर मतदारसंघ – हर्षदा देशमुख -जाधव (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे शिक्षक मतदारासंघ – कौस्तुभ गावडे (भाजप)

कर्नाटक विधान परिषद निवडणूक निकाल

1.बेंगळुरू शिक्षक मतदारसंघ-जनता दल(सेक्युलर)

2. उत्तर-पूर्व शिक्षक – भाजपा

3. दक्षिण-पूर्व पदवीधर- भाजपा

4. पश्चिम स्नातक – भाजपा

बिहार शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणूक

1. तिरहुत शिक्षक- बीजेपी

2. दरभंगा शिक्षक मतदारसंघ- जेएसपी

3. पाटणा शिक्षक- आरजेडी

4. पाटणा शिक्षक मतदारसंघ- जेडीयू

5. दरभंगा पदवीधर- बीजेपी

6. सारण शिक्षक मतदारसंघ- अपक्ष

7. कोसी पदवीधर- बीजेपी

8. तिरहुत पदवीधर- अपक्ष

उत्तर प्रदेशातील शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणूक निकाल

1 लखनऊ शिक्षक मतदारसंघ -भाजप

2. वाराणसी शिक्षक मतदारसंघ- समाजवादी पक्ष

3. बरेली-मुरादाबाद शिक्षक मतदारसंघ- भाजप

4. मेरठ पदवीधर मतदारसंघ – भाजप

5. इलाहाबाद-झांसी पदवीधर – समाजवादी पक्ष

6. वाराणसी पदवीधर – समाजवादी पक्ष

7. लखनऊ पदवीधीर – समाजवादी पक्ष

8. आगरा शिक्षक मतदारसंघ- समाजवादी पक्ष

9. आगरा पदवीधर- भाजप

10. गोरखपुर शिक्षक मतदारसंघ -भाजप

11. मेरठ शिक्षक मतदारसंघ – भाजप

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान