पोलीस बनून ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांची लूट, दोघांना अटक

नागपूर : पोलीस असल्याची बतावणी करुन रस्त्यावरील वाहनांना लुटणाऱ्या दोन बोगस पोलिसांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी हे बोगस पोलीस रस्त्यावरील वाहनांकडून पैसे मागत असत. मात्र या बोगस पोलिसाने फिर्यादीला मारहाण सुद्धा केली आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा …

पोलीस बनून ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांची लूट, दोघांना अटक

नागपूर : पोलीस असल्याची बतावणी करुन रस्त्यावरील वाहनांना लुटणाऱ्या दोन बोगस पोलिसांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई टाळण्यासाठी हे बोगस पोलीस रस्त्यावरील वाहनांकडून पैसे मागत असत. मात्र या बोगस पोलिसाने फिर्यादीला मारहाण सुद्धा केली आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलीस असल्याचं सांगून नागरिकांना कारवाईच्या नावावर लुटणाऱ्याची संख्या नागपुरात कमी होताना दिसत नाही. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी प्रशांत बांबोडे आणि त्याचा एक मित्र कपिल नगर बुद्ध विहार जवळ उभे राहून येणाऱ्या वाहनांना अडवत असत. आपल्या नातेवाईकांच्या अंत्य संस्काराला जात असलेल्या व्यक्तीला त्यांनी थांबवलं आणि दुचाकीवर असलेल्या फिर्यादीला तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत आहे. तुमची गाडी पोलीस स्टेशनला जमा करावी लागेल, नाहीतर तुम्ही पैसे द्या अशी मागणी या बोगस पोलिसांनी फिर्यादींकडे केली. मात्र फिर्यादीने आपल्या नातेवाईकाला बोलवल्यामुळे आरोपीने त्याला मारहाण केली. फिर्यादीचे नातेवाईक येताच त्यांनी या पोलिसाला आय कार्ड मागितल्यावर दोन्ही आरोपींनी तेथून पळ काढला.
फिर्यादीने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अशा प्रकारच्या घटना शहरात या आधी सुद्धा घडल्या आहेत. पोलिसांनी कारवाई सुद्धा केली. मात्र त्यात काही फारसा फरक पडलेला दिसत नाही. ज्या प्रमाणे या नागरिकाने सतर्कता दाखवून लुटणाऱ्या बोगस पोलिसाला कोठडीत पाठवलं तसंच धैर्य सगळ्यांनी दाखवले तर अशा बोगस पोलिसांवर आळा घातला जाऊ शकतो असे नागपूर पोलिसांनी सागंतले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *