प्रेमप्रकरणातून जन्मदात्यानेच अपंग मुलीला संपवलं

जालना : जन्मदात्या पित्यानेच गळा आवळून अपंग मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मृत तरूणीचे नाव छाया डुकरे असून ती 20 वर्षांची होती. छायाच्या पित्यानेच साडू आणि भाच्याच्या मदतीने तिची निर्घृण हत्या केली. समाधान नामदेव डुकरे (45) असे या आरोपी पित्याचे नाव आहे. प्रेमप्रकणातून हत्या झाल्याचं पोलीस चौकशीत समोर …

प्रेमप्रकरणातून जन्मदात्यानेच अपंग मुलीला संपवलं

जालना : जन्मदात्या पित्यानेच गळा आवळून अपंग मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मृत तरूणीचे नाव छाया डुकरे असून ती 20 वर्षांची होती. छायाच्या पित्यानेच साडू आणि भाच्याच्या मदतीने तिची निर्घृण हत्या केली. समाधान नामदेव डुकरे (45) असे या आरोपी पित्याचे नाव आहे. प्रेमप्रकणातून हत्या झाल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं.

तरुणीचा मृतदेह वालसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. मात्र 24 तास उलटूनही छायाचा मृतदेह अद्यापही शवविच्छेदनाविणा आरोग्य केंद्रात पडून आहे.

सोमवारी भोकरदन तालुक्यातील धावडा-मेहगाव रसत्यावर नाल्याच्या काठी छायाचा मृतदेह आढळून आला. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. पारध पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर तीन तासाच्या आतच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला. पोलिसांच्या तपासात प्रेमप्रकरणावरून पित्यानेच आपल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचं निष्पन्न झालं. जम्नदात्या पित्यानेच साडू आणि भाच्याच्या मदतीने गळा आवळून छायाची हत्या केली. त्याआधी तिला मारहाणही करण्यात आली.

याप्रकरणी पारध पोलिसांनी सोमवारी रात्री चार आरोपींना अटक केली. यात मृत छायाचे वडील समाधान नामदेव डुकरे, महादू कचरू उगले, आणा पुंजाजी लोखंडे, रामधन उत्तम दळवी यांचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *