AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा निर्णय! आता जेवणाची पंगत आयोजित करण्याआधी… नवा आदेश काय?

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता जेवणाची पंगत आयोजित करण्याच्या सात दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.

तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा निर्णय! आता जेवणाची पंगत आयोजित करण्याआधी... नवा आदेश काय?
tukaram mundhe fda food ruleImage Credit source: Google
| Updated on: Sep 03, 2026 | 6:35 PM
Share

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता जेवणाची पंगत आयोजित करण्याच्या सात दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सामूहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत अगोदरच माहिती द्यावी लागणार आहे. तसेच केटररने स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारा माल कुठून खरेदी केला याचीही माहिती द्यावी लागणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

FDA चा मोठा निर्णय

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील नागरिकांना सणांच्या काळात सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ईद, होळी आणि बकरी ईदपासून गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची तपासणी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी FDA ने व्यापक यंत्रणा तयार केली आहे.

3 सप्टेंबरपासून…

FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, ‘ईद असो किंवा दिवाळी, सणांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी अन्न मिळाले पाहिजे.’ महाराष्ट्रात ‘सेफ फूड अँड सेफ ड्रग’ ही संकल्पना राबवली जात असून, सणांच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यापूर्वी विविध सणांच्या काळात अन्न सुरक्षा नियमांनुसार कारवाई केली जात होती. मात्र, संपूर्ण वर्षभरासाठी सणनिहाय आणि पद्धतशीर नियोजन नव्हते. त्यामुळे 3 सप्टेंबरपासून वर्षभरातील सण-उत्सव लक्षात घेऊन अन्न सुरक्षा कारवाईचा विशेष ॲक्शन प्लॅन लागू केला जाणार आहे. या योजनेत कोणत्याही एका धर्माच्या सणाला वेगळे नियम नसतील. सर्व धर्मीय समुदायांचे सण आणि कार्यक्रम एकाच अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समान पद्धतीने तपासले जाणार आहेत.

कोणत्या अन्नपदार्थांवर विशेष लक्ष?

जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण कालावधीत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे. विशेषतः सणांच्या काळात उपवासाचे पदार्थ, खाद्यतेल, सुकामेवा, बेकरी उत्पादने आणि ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांवर FDA चे विशेष लक्ष राहणार आहे. याशिवाय महाप्रसाद, भंडारा आणि लंगरमध्ये तयार करून वाढण्यात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी केली जाणार आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजक तसेच अन्न तयार करणाऱ्या स्वयंपाक्यांना नियमितपणे फूड सेफ्टीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Follow Us
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट