Gondia : गोंदियात 96 गावांना पूराचा धोका, पूर परस्थितीवर नियंत्रणासाठी जवानांकडून रंगीत तालीम

| Updated on: Jul 05, 2022 | 10:51 AM

गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षा गोंदियामध्ये पावसाची कृपादृष्टी अधिक राहिलेली आहे. पावसाने जोरदार बँटींग केल्याने मान्सून कालावधीत केव्हाही पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नही. त्यामुळे पूर परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य करण्याकरिता प्रत्येक तालुक्यात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे.

Gondia : गोंदियात 96 गावांना पूराचा धोका, पूर परस्थितीवर नियंत्रणासाठी जवानांकडून रंगीत तालीम
गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती ओढावू शकते त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

गोंदिया : कोकण, मुंबई नंतर (Vidarbha) विदर्भात पावसाची कृपादृष्टी ही कायम राहिली होती. आता तर सबंध (Heavy Rain) राज्यात पाऊस सक्रीय झाला असतानाच गोंदियात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जलाशय नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झपाट्याने होत आहे. वाढती पाणीपातळी आणि पावसाचा जोर यामुळे जिल्ह्यातील 96 गावांना (Risk of flooding) पूराचा धोका निर्माण झाला आहे. असे असतानाच भविष्यात मनुष्यहानी होऊ नये म्हणून आतापासूनच योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्याच अनुशंगाने जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत गोंदिया येथील पांगडी जलाशयात रंगीत तालीम व सराव केला जात आहे.

गोंदियात पूर सदृश्य स्थिती

गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षा गोंदियामध्ये पावसाची कृपादृष्टी अधिक राहिलेली आहे. पावसाने जोरदार बँटींग केल्याने मान्सून कालावधीत केव्हाही पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नही. त्यामुळे पूर परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य करण्याकरिता प्रत्येक तालुक्यात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. भविष्यात मनुष्यहानी होऊ नये शिवाय वेळ पडली तर बचावकार्य करायचे कसे याचे धडे जवान घेत आहेत.

जिल्हा प्रशासनही सतर्क

आतापर्यंत पावसाच्या हुलकावणीमुळे चिंता व्यक्त केली जात होती. पण निसर्गाचा लहरीपणा काय असतो त्याचा प्रत्यय पुन्हा येत आहे. कारण सबंध राज्यात पावसाचा जोर वाढला असताना गोंदियामध्ये तर पूराचा धोका निर्माण झाला आहे. अजून काही दिवस पावसामध्ये सातत्य राहिले तर खेडेगावांना पाण्याचा विळखा असणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाचा आढावा घेऊन उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक तालुक्यात जनजागृती अन् कार्यक्र

केवळ गोंदिया शहरच नाहीतर संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे केव्हाही पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नही. पूर परस्थिती ओढावली तर सक्षमपणे तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे पूर परिस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य करण्याकरिता प्रत्येक तालुक्यात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत गोंदिया येथील पांगडी जलाशयात पूरपरिस्थिती रंगीत तालीम व सराव करण्यात आले.