AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : पेरणी होताच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी, शेतकऱ्यांजवळच रामबाण उपाय पण ऐकतो कोण?

खरिपातील पेरण्यांना वेग येत असतानाच बाजारपेठेत महाबीजच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकानदार हेच बियाणे तयार करीत आहेत. शिवाय त्याची उगवण क्षमता आणि इतर प्रक्रिया न करताच शेतकऱ्यांना ते विक्री करीत आहेत.त्यामुळे सध्या कधी नाव न ऐकलेले बियाणे देखील बाजारपेठेत पाहवयास मिळत आहे.

Kharif Season : पेरणी होताच बियाणे न उगवल्याच्या तक्रारी, शेतकऱ्यांजवळच रामबाण उपाय पण ऐकतो कोण?
सोयाबीन बियाणे
| Updated on: Jul 05, 2022 | 10:16 AM
Share

उस्मानाबाद : आता कुठे(Kharif Sowing) खरिपातील पेरण्यांना वेग आला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून गायब झालेला पाऊस गेल्या आठ दिवसांपासून सक्रीय झाल्याने खरिपातील सोयाबीन, कापूस पेरणी होत आहे. अजूनही संपूर्ण क्षेत्रावर पेरा झालेला नाही असे असतानाच आता (Seed) बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी (Agricultural Department) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात दाखल होत आहेत. आतापर्यंत 6 तक्रारी दाखल झाल्या आहेत गतवर्षी एकूण 5 हजारावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच यामध्ये लक्ष घातले तर शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. मात्र, घरगुती बियाणांचा पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतनाही शेतकरी हे बाजारातील बियाणांना महत्व देत आहे. विशेष म्हणजे सहाही तक्रारी ह्या सोयाबीनबाबतच आहेत. त्यामुळे या तक्रारीचा निपटारा कसा केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

घरचे बियाणेच मस्त अन् स्वस्तही

मराठवाड्यात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पिक आहे. त्यामुळे याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. तर दुसरीकडे विकतचे सोयाबीनचे बियाणे हे महागडे असून पुन्हा उगवण होते की नाही यावरुन शंका निर्माण होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आगामी काळातही घरचेच बियाणे वापरणे आवश्यक आहे. हे बियाणांचा पेरा करीत असताना देखील त्याची उगवण क्षमता तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्पादनावरही चांगला परिणाम होणार आहे.

महाबीजच्या बियाणांचा तुटवडा

खरिपातील पेरण्यांना वेग येत असतानाच बाजारपेठेत महाबीजच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकानदार हेच बियाणे तयार करीत आहेत. शिवाय त्याची उगवण क्षमता आणि इतर प्रक्रिया न करताच शेतकऱ्यांना ते विक्री करीत आहेत.त्यामुळे सध्या कधी नाव न ऐकलेले बियाणे देखील बाजारपेठेत पाहवयास मिळत आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई कऱण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. यातच शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर जगायचे कसे असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.

बियाणे खरेदी करताना ही घ्या काळजी

शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बियाणे घेतानाच योग्य पध्दतीने घेतले तर भविष्यातील नुकसान टळणार आहे.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....