Kolhapur Rain Video : कोल्हापुरात मुसळधार! राजाराम बंधारा पाण्याखाली, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Kolhapur News : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

भूषण पाटील

| Edited By: सिद्धेश सावंत

Jul 05, 2022 | 9:08 AM

कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसानं कोल्हापुरात (Kolhapur Rain Video) चार दिवसांपासून धुव्वाधार हजेरी लावली आहे. पंचगंगा नदी (Kolhapur Panchganga River) दुथडी भरुन वाहतेय. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे. पावसाच्या दमदार पुनरागमनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कोल्हापुरातील (Kolhapur News) शेती आणि मशागतीच्या कामांनाही वेग येण्याची शक्यता आहे. पुढच्या 48 तासांत पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढणार आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर गेली असून राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें