पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाचे निकाल हाती आली आहेत. हे निकाल पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. भाजपाला या निकालानंतर मोठा दणका बसला. थेट मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. एकूण पाच जागांसाठी पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या तर महायुतीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. प्रफुल्ल पटेलांचे होम पीच असलेल्या विदर्भात या पाच जागांपैकी एक जागा असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपला सुटली होती….या ठिकाणी भाजपचे सुधाकर कोहळे विरुध्द काँग्रेसचे अभिजित वंजारी अशी मुख्य लढत झाली. या लढतीत भाजपचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पराभव स्विकारावा लागला.
तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची एकमेव जागा आली होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली.
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवला. शरद पवारांपासून वेगळे होत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हा पक्ष वेगळा झाला. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पहिल्या फळीतील राष्ट्रीय पातळीवरील नेते समजल्या जातात. या सगळ्या निकालानंतर प्रफुल्ल पटेलांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीचे नाव न घेता आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे…प्रफुल्ल पटेलांनी आपल्या ट्विटमध्ये नेमके काय म्हटले आहे पाहा…
प्रफुल्ल पटेल ट्विट-
आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालांनी एक ठोस जागृती दिली आहे. विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी, आपली प्राधान्ये पुन्हा सेट करण्यासाठी आणि आपली संघटनात्मक रचना दुरुस्त करण्यासाठी शक्य तितक्या लवकर स्वतःचे आकलन करणे गरजेचे आहे.