AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinde Government : शिंदे सरकारचे ‘महिला शक्तीला बळ’, अशी मिळणार तात्काळ मदत

केंद्राच्या 'मिशन शक्ती' योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील संकटग्रस्त आणि पिडीत महिलांना बळ मिळावे, अडचणीच्या वेळी महिला शक्तीला तात्काळ मिळावी यासाठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Shinde Government : शिंदे सरकारचे 'महिला शक्तीला बळ', अशी मिळणार तात्काळ मदत
MAHARASHTRA MAHILA SHAKTI Image Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jan 12, 2023 | 8:55 PM
Share

मुंबई : राज्यातील संकटग्रस्त आणि पिडीत महिलांना बळ मिळावे, अडचणीच्या वेळी महिला शक्तीला तात्काळ मिळावी यासाठी शिंदे फडणवीस ( SHINDE – FADNAVIS GOVT. ) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे संकटग्रस्त आणि पिडीत महिलांना केवळ आपली सुरक्षाच करता येणार नाही. तर, महिलांसाठी असलेल्या राज्य सरकारच्या विविध शासकीय योजना, सुविधा याबद्दलची माहिती मिळणार आहे. तसेच, महिला ज्या भागात राहते किंवा नोकरी करते त्या परिसरात आवश्यकतेनुसार हुंडा प्रतिबंधक अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि संरक्षण अधिकारी इत्यादींशी संपर्क साधण्यासाठी ही योजना परिणामकारक ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘मिशन शक्ती’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. ‘मिशन शक्ती’ योजनेच्या ‘संबल’ या महिलांची सुरक्षा व संरक्षण उपाययोजनेअंतर्गत राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या स्तरावरुन ‘१८१’ ही महिला टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेच्या माध्यमातून आणीबाणीच्या सहाय्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली (ERSS), वन स्टॉप सेंटर (One Stop Centre), १०९८ चाईल्ड लाईन, NALSA हेल्पलाइन, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका इत्यादी सर्व आपत्कालीन आणि गैर-आपत्कालीन सेवा आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीशी (Emergency Response Support System-ERSS) जोडण्यात येणार आहेत. तसेच, सर्व आपत्कालीन सेवा मदत आणि माहिती शोधणाऱ्या महिलांना टोल-फ्री हेल्पलाईन दूरसंचार सेवा २४ तास उपलब्ध रहाणार आहे.

१८१ हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना मानसिक-सामाजिक समुपदेशन, कायदेशीर मदत, सशक्तीकरण आणि विकास (कौशल्य, शिक्षण, आर्थिक समावेशन, उद्योजकता इत्यादींसह) विविध संस्थात्मक आणि योजनाबद्ध सेटअपशी जोडण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. संकटग्रस्त परिस्थितीत ती महिला किंवा तिच्यावतीने कोणीही या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकणार आहे.

महिलांना कायदे आणि सरकारच्या विद्यमान योजनांबद्दल महिला हेल्पलाईनव्दारे माहिती देण्यात येणार आहे. ज्यांना कोणत्याही परिस्थितीजन्य किंवा शारीरिक आव्हानांमुळे बोलता येत नाही, संवाद साधता येत नसणाऱ्या, श्रवण आणि बोलण्याची कमतरता असलेल्या आणि दिव्यांग लोकांच्या गरजा विचारात घेऊन मजकूर किंवा इतर प्रकारच्या संदेशांद्वारे महिला हेल्पलाईनव्दारे मदत किंवा माहिती दिली जाणार आहे. SAAR IT RESOURCES PVT. L.T.D, मुंबई या संस्थेच्या मदतीने ही महिला हेल्पलाईनव्दारे राज्यात सुरू करण्यात आली आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?