AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shripad Chhindam Arrest :आधी शिवरायांचा अपमान, आता नवा कारनामा, श्रीपाद छिंदमला पुन्हा बेड्या

छत्रपती शिवरायांचा ( Chhatrapati Shibaji Maharaj ) अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ( Shripad Chhindam ) एका ज्युस सेंटर चालकास जातीवाचक शिवीगाळ ( Abusive Language on Cast ) केल्याने अटक करण्यात आली आहे.

Shripad Chhindam Arrest :आधी शिवरायांचा अपमान, आता नवा कारनामा, श्रीपाद छिंदमला पुन्हा बेड्या
श्रीपाद छिंदम
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 15, 2021 | 12:48 PM
Share

अहमदनगर: छत्रपती शिवरायांचा ( Chhatrapati Shibaji Maharaj ) अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला ( Shripad Chhindam ) एका ज्युस सेंटर चालकास जातीवाचक शिवीगाळ ( Abusive Language on Cast ) केल्याने अटक करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांनाही तोफखाना पोलिसांनी ( Tofkhana Police ) अटक केली. ज्युस चालकाला शिविगाळ केल्याचं प्रकऱण कोर्टात पोहचलं होतं, जिथं छिंदम आणि त्याच्या भावाने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी छिंदमसह ( Shripad Chhindam Arrest ) त्याच्या भावाला बेड्या ठोकल्या.  (Former Ahmednagar mayor Shripad Chhindam arrested by Tofkhana police for using caste abusing word )

काय आहे प्रकरण?

9 जुलै 2021 रोजी दुपारी 12.30 दरम्यानची घटना. दिल्ली गेट भागात ज्युस सेंटर चालकाला माजी महापौर श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांनी दमदाटी करत जातीवाचक शिविगाळ केली होती. त्यानंतर ज्युस सेंटर चालकाने पोलिसात धाव घेतली. प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर छिंदमने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. यानंतर तोफखाना पोलिसांनी छिंदमला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे आणि राजेंद्र म्याना यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.त्यातील दोघांना सशर्त जामीन मिळाला, मात्र श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांना जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

शिवरायांबद्दल अपशब्द काढणारा छिंदम

अहमदनगरचा उपमहापौर असताना श्रीपाद छिंदम याने मनपा अधिकाऱ्याला फोनवरुन शिविगाळ केली होती. या दरम्यान छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारं वक्तव्य केलं. ही ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर श्रीपाद छिंदम हा फरार झाला. या काळात छिंदमच्या घरावर दगडफेकही झाली होती. मात्र, एवढं होऊनही श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा मनपा निवडणुकीला उभा राहिला आणि एवढ्या वाईट पातळीचं कृत्य करुनही त्याचा त्या निवडणुकीत विजयही झाला. मनपा निवडणुकीतील विजयानंतर श्रीपाद छिंदमने पश्चाताप केल्याचं दाखवलं, छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेसमोर त्याने माफी मागितली. हेच काय तर विधानसभेच्या निवडणुकीत बसपा त्याला तिकीट दिलं आणि त्याने दणदणीत प्रचारही केला. मात्र, मतदारांनी त्याला नाकारल्यानं त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!