आता मला जेलमध्ये टाकलं तरी मी…, गंगाधर काळकुटेंच्या पोस्टने चर्चेला उधाण, जरांगे पाटलांचं नाव घेत मोठा दावा

मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली, या ऑडिओ क्लिपनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता गंगाधर काळकुटे यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

आता मला जेलमध्ये टाकलं तरी मी..., गंगाधर काळकुटेंच्या पोस्टने चर्चेला उधाण, जरांगे पाटलांचं नाव घेत मोठा दावा
गंगाधर काळकुटे यांचा मोठा दावा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 24, 2026 | 8:13 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले, असं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. दरम्यान आता या ऑडिओ क्लिपवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.  या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत.

प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी काळकुटेंचे एकनाथ शिंदेंसोबत संबंध असून आंदोलनात खत, पाणी घालायला कोणी सोडले होते असा प्रश्न केला. तर जरांगे यांचे जुने सहकारी अमोल खूने यांनी गंगाधर काळकुटेंचे परदेश कनेक्शन असून परदेशातून आंदोलनाला फंडिंग होते, त्यांची संपत्ती परदेशात आहे असा गंभीर आरोप केला. दरम्यान त्यानंतर आता काळकुटे यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्यावर सुरू असलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाले काळकुटे? 

जरांगे पाटलांसोबत असल्याने मला टार्गेट केले जात आहे, कुठलीही चौकशी करा किंवा खोटे आरोप करून जेलमध्ये टाका मी मागे हटणार नाही, असं काळकुटे यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. काळकुटे यांची ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे.

अमोल खुणेंचा आरोप 

दरम्यान दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे जुणे सहकारी असलेल्या अमोल खुणे यांनी देखील या ऑडिओ क्लिपवरून गंभीर आरोप केले आहेत. गंगाधर काळकुटेंचे परदेश कनेक्शन असून परदेशातून आंदोलनाला फंडिंग होते, त्यांची संपत्ती परदेशात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे, तसेच मनोज जरांगे यांच्याकडे जी ऑडिओ क्लिप होती, ती 2024 पासून माझ्याकडे देखील आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us