जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट! गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट झालाय. गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ट्विस्ट! गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड
Girish mahajan news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 1:44 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता गुलाबराव पाटील यांच्याकडे लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झालीये. गिरीश महाजन यांच्या विरोधात असलेला भाजप कार्यकर्ता तुकाराम निकम यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो आणि भाऊ फक्त तुमच्यासाठी, असा फलक घेऊन तुकाराम निकम यांनी माघार घेतली. त्यामुळे जामनेर विकास सोसायटी मतदारसंघातून गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड होणार आहे. मंत्री गिरीश महाजन हे पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. बँकेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या आतापर्यंत दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us