AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NashikGold: सोन्याच्या दराचे रॉकेट दिवाळीआधीच सनाट, महिन्यात हजाराची वाढ!

सोन्याचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत. पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.

NashikGold: सोन्याच्या दराचे रॉकेट दिवाळीआधीच सनाट, महिन्यात हजाराची वाढ!
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 26, 2021 | 4:36 PM
Share

नाशिकः सोन्याचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत. नाशिकच्या सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49850 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले.

नाशिकच्या सराफा बाजारात 1 सप्टेंबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. मात्र, आता या दरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49850 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 68000 रुपये नोंदवले गेले आहेत, अशी माहिती सराफा दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नेवासे यांनी दिली. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

आता दिवाळीचे वेध

नाशिकच्या सराफा बाजारात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मोठी उलाढाल झाली. अनेकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीस प्राधान्य दिले. दसऱ्याचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल नाशिकमध्ये झाली. आता काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीच्या पाडव्यादिवशी अनेकजण सोने खरेदी करायला प्राधान्य देतात. दिवाळीच्या चारी दिवसांतही सराफा बाजारात मोठी गर्दी असते. ते पाहता आता व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दिवाळी सणाकडे लागले आहेत. सोबतच येत्या काळात सोन्याचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आता जोखीम संपली

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.

सध्या सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. नाशिकच्या सराफा बाजार पेठेत मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49850 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर

‘मविआ’च्या शिल्पाची काळजी घ्यावी, मी सेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा षटकार, नांदगावबद्दल पवारांशी बोलणार

Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान