Gowandi Crime : गोवंडीत बदलापूरसारखचं घडलं ! रिकाम्या वर्गात मुलाला न्यायचा आणि.. शाळेतल्या शिपायाने नको ते केलं..

गोवंडीतील नामांकित शाळेत एका 45 वर्षीय शिपायाने 6 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाने पालकांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ गोवंडी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी राजेश महाकाळला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. यामुळे शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Gowandi Crime : गोवंडीत बदलापूरसारखचं घडलं ! रिकाम्या वर्गात मुलाला न्यायचा आणि.. शाळेतल्या शिपायाने नको ते केलं..
क्राइम न्यूज
| Updated on: May 08, 2026 | 2:33 PM

बदलापूरमधील नामांकित शाळेतील शिपायाने दोन चिमुकल्या मुलींशी अश्लील वर्तन केलं होतं. त्या प्रकाराने अख्खा महाराष्ट्र हादरला, पण विकृत गुन्हेगारांना अजूनही कायद्याचा धाक नाही हेच समोर आलं आहे. कारण बदलापूरच्या त्याच घटनेची आता गोवंडीत पुनरावृत्ती झाली आहे. गोवंडीतील नामांकित शाळेत काम करणाऱ्या 45 शिपायाने अवघ्या 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे णोठी खळबळ माजली आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, गेल्या वर्षभरापासून आरोपी हा घृणास्पद प्रकार करत होता. अखेर या घटनेची माहिती त्या चिमुकल्याने आपल्या पालकांना दिली. ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी लगेच गोवंडी पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार केली. या घटनेची गंभीर दखल घेत गोवंडी पोलिसांनी आरोपी राजेश महाकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणी गोवंडी पोलिस अधिक तपास करत आहेत

रिकाम्या खोलीत करायचा नको ते कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला मुलगा गोवंडीतील नामांकित शाळेत शिकतो. आरोपी राजेश महाकाळ हा त्याच शाळेत शिपाई म्हणून काम करतो. मात्र गेल्या वर्षभरापासून तो पीडित मुलाशी नको ते चाळे करत होता. विद्यार्थी शाळेत असताना, आरोपी त्य़ाला रिकाम्या वर्गात घेऊन जायचा आणि त्याच्याशी गैरवर्त करायचा, वर्षभरापासून हा घाणेरडा प्रकार सुरू होता. मात्र तेव्हा तो मुलगा काही बोलू शकला नाही. अखेर त्याने नुकतेच आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. मुलासोबत घडलेलं हे ऐकून ते हादरले, मात्र घाबरून न जाता त्यांनी या प्रकाराला वाचा फोडण्याचं ठरवलं. आणि पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांकडून आरोपी राजेश महाकाळला अटक करण्यात आली असून त्याला शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us