खवय्यांसाठी चांगली बातमी, पोस्टातून थेट मिळवा घरपोहोच सेंद्रिय हापूस आंबे

| Updated on: Apr 01, 2024 | 10:56 AM

post department hapus mango: रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत पुणे, मुंबईत सुद्धा आंबा मिळणार आहे. त्यासाठी काही दिवसांत आंब्याच्या बुकिंगची योजना सुरू केली जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत नोंदणी करावयाची पोस्ट कार्यालयेसुद्धा जाहीर होतील.

खवय्यांसाठी चांगली बातमी, पोस्टातून थेट मिळवा घरपोहोच सेंद्रिय हापूस आंबे
post department
Follow us on

मार्च महिना सुरु झाला की खवय्यांना आंब्यांचे वेध लागतात. त्यातच कोकणातील हापूसची चव सर्वात वेगळी. यामुळे देशात नाही तर विदेशातही हापूस आंब्यांना मागणी असते. परंतु बाजारात मिळत असणारा हापूस आंबा अस्सल आहे का? अशी शंका नेहमीच उपस्थित केली जाते. आता भारतीय डाक विभागाने घरपोच हापूस आंबे सेवा सुरु केली आहे. यामध्ये ग्राहकांना अस्सल सेंद्रिय हापूस आंबे घरपोहोच मिळणार आहे. भारतीय पोस्ट विभागाने उत्पादक ते ग्राहक अशी ही सेवा सुरू केली आहे. त्यात देवगडचा अस्सल हापूस मिळणार आहे.

पोस्टाने उचलले अनोखे पाऊल

भारतीय टपाल विभाग विविध योजना राबवत असतो. रक्षाबंधणासाठी पोस्टाची अनोखी योजना असते. आता प्रथमच हापूस आंबे ग्राहकांना पोस्ट विभाग उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी थेट उत्पादकांना ग्राहकाशी जोडण्याचे पाऊल पोस्ट विभागाने उचलले आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्याचा माल ग्राहकांपर्यंत योग्य मूल्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठ मिळणार आहे. सध्या ही सुविधा सांगली शहरातील निवडक टपाल कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. सांगलीतील चार पोस्ट कार्यालयात नोंदणीसाठी ऑफलाईन व्यवस्था करण्यात आली आहे.

पोस्ट विभाग कोठून घेणार आंबे

पोस्ट विभागाने कोकणातील दहिबाव (ता. देवगड) येथील शेतकरी श्रीधर ओगले यांच्याशी करार केला आहे. त्यांच्या आंबा बागेतील आंब्यास जीआय मानांकन मिळाले आहे. कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापर शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा ते उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना खात्रीशीर उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. ओगले आंबा व्यवसायात १८ वर्षांपासून आहे. सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत.

हे सुद्धा वाचा

मुंबई, पुणे शहरात मिळणार आंबा

रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत पुणे, मुंबईत सुद्धा आंबा मिळणार आहे. त्यासाठी काही दिवसांत आंब्याच्या बुकिंगची योजना सुरू केली जाणार आहे. त्यासाठी रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत नोंदणी करावयाची पोस्ट कार्यालयेसुद्धा जाहीर होतील. ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था सध्या नाही.

गुढीपाडव्याला मिळणार आंबा

  • नोंदणी केलेल्या ग्राहकांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबा दिला जाणार आहे.
  • आंब्याची पेटी घरपोहोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
  • नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना आंबा कधी मिळणार ती तारीख कळवली जाईल.